कुरुंदवाड : मजरेवाडी (ता. शिरोळ) येथील सरपंचपदी विरोधी महालक्ष्मी आघाडीच्या संगीता परीट, तर उपसरपंचपदी सत्ताधारी महाविकास आघाडीचे महेश नरुटे यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी व्ही.डी. शिंगाडे होते.
ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचे ९ पैकी ६ सदस्य निवडून आले आहेत, तर विरोधी महालक्ष्मी आघाडीला तीन जागा मिळाल्या आहेत. मात्र, सरपंचपदाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला पडल्याने व बहुमत असलेल्या आघाडीकडे या प्रवर्गातील उमेदवार नसल्याने, कुंभार यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी शिंगाडे यांनी केली. यावेळी शंकर कागले, नंदकिशोर पाटील, अरुणा खुरपे, सुनीता पोटे, लक्ष्मण चौगुले, किशोर जुगळे, अंकिता चव्हाण, शेखर कागले, पार्वती गवंडी यांची उपस्थिती होती.
फोटो - २८०२२०२१-जेएवाय-०२-संगीता परीट, महेश नरुटे
-------------------------------
बस्तवाड सरपंचपदी प्रदीप चौगुले
कुरुंदवाड : बस्तवाड (ता. शिरोळ) येथील सरपंचपदी प्रदीप चौगुले, तर उपसरपंचपदी किरण कांबळे यांची निवड झाली. अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी सुनील रूपनर होते. या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी रूपनर यांनी केली. यावेळी जाफर पटेल, बाळासाहेब कोळी, कृष्णा कांबळे, संगीता कांबळे, आशा नाईक, श्रीशैल्य जंगम, शांताबाई लाटकर आदींची उपस्थिती होती.
फोटो - २८०२२०२१-जेएवाय-०३-प्रदीप चौगुले, किरण कांबळे
----------------------------
तेरवाड सरपंचपदी लक्ष्मी तराळ
कुरुंदवाड : तेरवाड (ता. शिरोळ) येथील सरपंचपदी लक्ष्मी तराळ, तर उपसरपंचपदी जालिंदर सांडगे यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत काळगे होते. सरपंचपदासाठी तराळ, तर उपसरपंचपदासाठी सांडगे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी काळगे यांनी केली. यावेळी सदाशिव माळी, संजय अनुसे, संतोष भुयेकर, विजय गायकवाड, पूर्णिमा गोंधळी, ग्रामसेवक अवधूत रेळेकर उपस्थित होते.
फोटो - २८०२२०२१-जेएवाय-०४-लक्ष्मी तराळ, जालिंदर सांडगे