शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
6
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
7
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
8
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
9
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
10
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
11
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
12
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
13
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
14
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
15
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
16
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
17
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
18
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
19
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
20
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला

शिरोळ तालुक्याची ‘जीवनदायिनी’ धोक्यात

By admin | Published: December 28, 2015 12:10 AM

बावीस गावांना वरदान : पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळेच बंधाऱ्याची दुरवस्था; गळती कायम

संदीप बावचे - शिरोळ तालुक्यातील नागरिकांना ‘जीवनदायी’ ठरलेला आणि शेतकऱ्यांना ‘वरदान’ असलेला राजापूर बंधारा कमकुवत बनल्यामुळे तो अखेरची घटका मोजत आहे. बंधाऱ्याच्या तळपातळीखालील दगड निघून गेले आहेत. बरगे घालूनही गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पाणी गळतीचा फायदा कर्नाटक राज्याला होत आहे. कमकुवत झालेला हा बंधारा ढासळला तर तालुक्यातील २२ गावांचा पाणीप्रश्न गंभीर बनणार आहे. वेळीच या बंधाऱ्याकडे लक्ष न दिल्यास तालुक्यावर पाणी-पाणी म्हणण्याची वेळ येणार आहे.कृष्णा नदीवर बांधण्यात आलेला राजापूर येथील बंधारा तालुक्यातील नागरिकांना जीवनदायी म्हणून ओळखला जातो. १९८० ला हा बंधारा बांधण्यात आला. उन्हाळ्यात पाणी आडवून राजापूरसह मजरेवाडी, कुरुंदवाड, अकिवाट, नृसिंंहवाडी, औरवाड, गौरवाड, गणेशवाडी, कवठेगुलंद, शेडशाळ, आलास, बुबनाळ, बस्तवाड, शिरोळ, कनवाड, कुटवाड, घालवाड, शिरटी, धरणगुत्ती, आगर, हसूर, राजापूरवाडी आदी २२ गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरावा यासाठी राजापूर बंधारा बांधण्यात आला. या २२ गावांबरोबरच इचलकरंजी शहरालाही पाणीपुरवठा याच कृष्णेच्या पात्रातून होतो. गेल्या ३५ वर्षांपासून बंधाऱ्याच्या बॅकवॉटरचे पाणी नागरिकांना जीवनदायी, तर शेतकऱ्यांना वरदान ठरले आहे. कृष्णेच्या पाण्यावर असलेली शेती सुजलाम्, सुफलाम् बनल्याने तालुक्याचा विकास झाला आहे. राजापूर बंधारा हा आता कमकुवत बनला आहे. एकूण ६५ गाळे या बंधाऱ्यावर असून बंधाऱ्याच्या तळपातळीखालील दगड पाण्याच्या प्रवाहामुळे निखळून गेले आहेत. बहुतांश गाळ्यांतील दगड निघून गेले आहेत. २००५ ला आलेल्या महापुरात झाडाचे मोठमोठे बुंधे बंधाऱ्याला येऊन तटल्यामुळे बंधाऱ्याची दुरवस्था झाली आहे. बंधाऱ्यावर बरगे घातले तरी गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते. यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाई असताना गळतीमुळे पाणी वाया जाते. बंधारा दुरुस्त करावयाचा झाल्यास एक वर्ष बरगे घालता येणार नाहीत. बंधाऱ्याची दुरुस्ती जरी झाली तरी ३५ वर्षे पूर्ण झालेला बंधारा कितपत टिकणार हा प्रश्नही उपस्थित होत आहे. कमकुवत बनत चाललेला राजापूर बंधारा एक-दोन वर्षांत ढासळला तर येथे बंधारा होता असे म्हणण्याची वेळ येऊ नये.शिरोळ तालुक्यातील २२ हून अधिक गावांना वरदान ठरलेला राजापूर बंधारा दुर्लक्षित झाला आहे. शेती व पिण्याच्या पाण्याची तहान भागविणारा हा बंधारा अखेरची घटका मोजत आहे. ‘नेमिची येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे लोकप्रतिनिधींकडून आश्वासने मिळतात, तर सांगली पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेला हा बंधारा कोल्हापूर जिल्ह्यात असल्यामुळे पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळेच बंधाऱ्याची ही अवस्था बनली आहे. याचा वेध घेणारी ‘राजापूर बंधाऱ्याला अवकळा’ ही मालिका आजपासून...कर्नाटककडून बंधारा टार्गेट?शिरोळ तालुक्यातील गावांना या धरणातून बॅकवॉटरचे पाणी मिळते. सन २००३ ला उन्हाळ्यात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. धरणात पुरेसे पाणी नसल्याने कर्नाटकाकडे पाणीपुरवठा केला गेला नव्हता. याचा राग मनात धरून कर्नाटकातील शेतकऱ्यांनी रात्रीत धरणावर हल्ला करून बरगे काढून धरण फोडण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेचा बोध घेता आणि यंदा पाऊस कमी झाल्याने व दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने पाणी समस्या निर्माण होण्यापूर्वी पाटबंधारे विभागाने दखल न घेतल्यास बंधाऱ्याचे पाणी पुन्हा पेटण्यास वेळ लागणार नाही.