कोल्हापूर : सामायिक भिंतीच्या कारणावरून शिरोली दुमाला (ता.करवीर) येथे हवेत गोळीबार केल्याप्रकरणी काल, मंगळवारी करवीर पोलिसांनी अटक केलेल्या संशयित राहुल तुकाराम पाटील (वय ३४) यांच्या ०.३२ या रिव्हॉल्व्हरचा परवाना रद्द करणार्याचा अहवाल पोलीस वरिष्ठांना पाठविणार आहेत. आज मंगळवारी न्यायालयाने राहुल पाटीलची जामिनावर मुक्तता केली. याबाबत पोलिसांनी सांगितले की, सामायिक भिंतीच्या कारणावरून तुकाराम नारायण पाटील व दत्तात्रय सदाशिव पाटील यांच्यात वाद आहे. या वादातून संशयित राहुल पाटीलने हवेत गोळीबार केला. या प्र्रकरणी हे प्रकरण परस्पर मिटवण्यात आले. मात्र, पोलीस स्वत: फिर्यादी झाले. त्यात राहुलला अटक करून त्याचे रिव्हॉल्व्हर जप्त केले. रिव्हॉल्व्हर हे आत्मसंरक्षणासाठी तसेच जीविताला धोका निर्माण झाला तर रिव्हॉल्व्हरचा वापर करण्याचा नियम आहे.पण,याद्वारे जर कोण दहशत माजवत असेल तर त्याचा परवाना रद्द करता येतो. दरम्यान,याबाबत तपास अधिकारी पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे म्हणाले, राहुल पाटील याचा रिव्हॉल्व्हरचा परवाना रद्द करण्याचा अहवाल वरिष्ठांना पाठविणार आहे. (प्रतिनिधी)
शिरोली गोळीबार; रिव्हॉल्व्हर परवाना रद्दच्या हालचाली
By admin | Published: June 05, 2014 1:03 AM