शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
3
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
4
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
5
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
6
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
7
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
8
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
9
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
10
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
11
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
12
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
13
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
14
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
15
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
16
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
17
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
18
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
19
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
20
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द

शिरोली, उत्तूर, खडकेवाडाची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:49 AM

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्यावतीने देण्यात येणारे ‘यशवंत सरपंच’, ‘यशवंत ग्रामपंचायत’ व ‘आदर्श ग्रामसेवक’ पुरस्कार बुधवारी जाहीर करण्यात आले. दोन वर्षांचे हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. २०१६/१७ सालचा जिल्हास्तरीय पहिला पुरस्कार पुलाची शिरोली ग्रामपंचायतीला, तर २०१७/१८ चा हाच पुरस्कार उत्तूर (ता. आजरा) व खडकेवाडा (ता. कागल) ग्रामपंचायतींना विभागून जाहीर करण्यात ...

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्यावतीने देण्यात येणारे ‘यशवंत सरपंच’, ‘यशवंत ग्रामपंचायत’ व ‘आदर्श ग्रामसेवक’ पुरस्कार बुधवारी जाहीर करण्यात आले. दोन वर्षांचे हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. २०१६/१७ सालचा जिल्हास्तरीय पहिला पुरस्कार पुलाची शिरोली ग्रामपंचायतीला, तर २०१७/१८ चा हाच पुरस्कार उत्तूर (ता. आजरा) व खडकेवाडा (ता. कागल) ग्रामपंचायतींना विभागून जाहीर करण्यात आला आहे. शनिवारी (दि. १७) पुरस्कार वितरण होईल.जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून २००४/०५ पासून ‘यशवंत ग्रामपंचायत’ पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. प्रत्येक तालुक्यातून आलेल्या पहिल्या ग्रामपंचायतीस २५ हजार, तर दुसºया क्रमांकाच्या ग्रामपंचायतीस १५ हजार रुपयांचा पुरस्कार देण्यात येतो तसेच जिल्ह्यात उत्कृष्ट ठरलेल्या प्रथम क्रमांकाच्या ग्रामपंचायतीस ५० हजार व दुसºया क्रमांकाच्या ग्रामपंचायतीस ३० हजार रुपयांचा पुरस्कार देण्यात येतो. जी ग्रामपंचायत तालुक्यातून पहिली येते त्या गावच्या सरपंचांनाही १ हजार रुपये व पदक या स्वरूपात पुरस्कार देऊन गौरविण्यात येते, तसेच ग्रामसेवकांनाही ‘आदर्श ग्रामसेवक’ पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. त्यांना प्रशस्तिपत्रक व पदक देण्यात येते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार आणि ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.या पुरस्कारांचे वितरण शनिवारी (दि. १७) शाहू सांस्कृतिक मंदिर येथे होणाºया कार्यशाळेमध्ये करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, पोपटराव पवार व जिल्हा परिषदेच्या पदाधिकाºयांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. या मान्यवरांबरोबरच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख व ‘लोकमत’चे वरिष्ठ वार्ताहर समीर देशपांडे हे कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. दोन वर्षांचे पुरस्कार विजेत्या ग्रामपंचायती, सरपंच आणि ग्रामसेवक पुढील प्रमाणे...यशवंत ग्रामपंचायत (तालुकास्तरीय पहिले दोन विजेते)आजरा - लाटगांव, पेद्रेवाडी / उत्तूर, वेळवट्टीगगनबावडा - वेसर्डे, असळज / असंडोली, तळये बु.भुदरगड - डेळे चिवाळे, नवले / पाळ्याचा हुडा, राणेवाडीगडहिंग्लज - ऐनापूर, करंबळी / हेब्बाळ-जलद्याळ, शिप्पूर तर्फ नेसरीचंदगड - अलबादेवी, इब्राहिमपूर / नागनवाडी, मुरुकटेवाडीहातकणंगले - शिरोली पुलाची, किणी / पट्टणकोडोली, चावरेकरवीर - कुडित्रे, दोनवडे / बेले, भुयेवाडीकागल - तमनाकवाडा, बाळेघोल / खडकेवाडा, गोरंबेपन्हाळा - कळे / खेरिवडे, कुशिरे तर्फ ठाणे / पोर्ले तर्फ ठाणे, कोडोलीराधानगरी - माजगांव, शेळेवाडी / घोटवडे, तळाशीशिरोळ - कोंडिग्रे, हसूर / घोसरवाड, बस्तवाडशाहूवाडी - बांबवडे / आकु र्ळे, भेडसगांवआदर्श ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारीआजरा - संदीप चौगले (देवर्डे)/ रणजित पाटील (लाटगाव)भुदरगड - दत्तात्रय माने (मडिलगे खुर्द)/ अनिमा इंदूलकर (मेघोली)चंदगड - अमृत देसाई (हलकर्णी)/ जनाबाई जाधव, उमगावगडहिंग्लज - संदीप धनवडे / प्रमोद जगताप (खमेलहट्टी, हुनगिनहाळ)गगनबावडा - अमित पाटील (वेतवडे) / पांड ुरंग मेंगाणे (असंडोली)कागल - निवृत्ती कुंभार (कौलगे, खडकेवाडा) / सागर पार्टे (सोनाळी)करवीर - संदीप तेली (वरणगे) / राजेंद्र गाढवे (गडमुडशिंगी)पन्हाळा - आनंदा तळेकर (कुशिरे तर्फ ठाणे) / कृष्णात पोवार (कोळीक)राधानगरी - रमेश तायशेटे (ओलवण) / लक्ष्मण इंगळे (तारळे खुर्द)शिरोळ - जमीर आरकाटे (मजरेवाडी) / भाग्यश्री केदार (चिंचवाड)शाहूवाडी - भास्कर भोसले (कांडवण)/ सुनील सुतार (नांदगाव)यशवंत सरपंच पुरस्कारआजरा - कल्याणी सरदेसाई (लाटगाव), हर्षदा खोराटे (उत्तूर)भुदरगड - श्रावण भारमल (डेळे चिवाळे), सरिता तेजम (पाळ्याचा हुडा)चंदगड - धोंडिबा घोळसे (अलबादेवी), रवींद्र बांदिवडेकर (नागनवाडी)गगनबावडा - कृष्णात पाटील (वेसर्डे), युवराज पाटील (असंडोली)गडहिंग्लज - दिग्विजयसिंह कुराडे, अरविंद दावणे (हेब्बाळ- जलद्याळ)हातकणंगले - बिस्मिल्ला महात (शिरोली पुलाची), खाना अवघडे (पट्टणकोडोली)कागल - दत्तात्रय चव्हाण (तमनाकवाडा), नंदिनीदेवी घोरपडे (खडकेवाडा)करवीर - विजय ऊर्फ सरदार पाटील (कुडित्रे), राजेंद्र कारंडे (बेले)पन्हाळा - सरिता पाटील (कळे / खेरिवडे), भाऊसाो चौगुले (पोर्ले तर्फ ठाणे)राधानगरी - सविता चौगले (माजगाव), भारती डोंगळे (घोटवडे)शिरोळ - नानासाो कांबळे (कोंडिग्रे), बाबासाो पुजारी (घोसरवाड), प्रज्ञा चव्हाण (बस्तवाड, विभागून)शाहूवाडी - विष्णू यादव (बांबवडे), सर्जेराव पाटील (आकुळे)