कोल्हापूर : तीन वर्षे रखडलेल्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांना अखेर न्याय मिळाला. २०१९-२०, २०२०-२१ आणि २०२१-२२ या तीन वर्षांचे राज्य पुरस्कार सरकारने शुक्रवारी जाहीर केले. कोल्हापूर जिल्ह्यातील सहा खेळाडूंना हा राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. लवकरच एका समारंभात या खेळाडूंना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.राज्य सरकारकडून विविध क्रीडा प्रकारात प्रावीण्य मिळवणाऱ्या खेळाडूंच्या सन्मानार्थ हे पुरस्कार देण्यात येतात. २०१९-२० या वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील अश्विनी राजेंद्र मळगे हिला वेटलिफ्टिंग या खेळप्रकारात तसेच २०२१-२२ या वर्षासाठी दिव्यांग खेळाडूंच्या पुरस्कारांमध्ये उचगांव येथील आरती जानोबा पाटील हिला बॅडमिंटन खेळासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे.याशिवाय २०२०-२१ या वर्षासाठी पॉवरलिफ्टिंगमध्ये दिंडनेर्ली (ता. करवीर) येथील सोनल सुनील सावंत, मुरगुड (ता. कागल) येथील स्वाती संजय शिंदे हिला कुस्तीसाठी, पेठवडगाव येथील अभिज्ञा अशाक पाटील हिला नेमबाजीसाठी, गडमुडशिंगी येथील स्वप्नाली चंद्रकांत वायदंडे हिला सॉफ्टबॉलसाठी हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.
अखेर शिवछत्रपती पुरस्कार जाहीर, कोल्हापूर जिल्ह्यातील सहा खेळाडूंचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 11:29 AM