शहरं
Join us  
Trending Stories
1
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
2
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
3
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
4
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: गडकरी ‘ॲक्शन मोड’मध्ये, राज्यात ९ दिवसांत ५० सभा घेणार
6
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
7
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
8
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
9
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
10
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
11
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
12
पत्नी, वडिलांचा अपमान करणाऱ्याचा काढला काटा, पनवेलमधील घटना, उत्तर प्रदेशातून १ अटकेत
13
मार्गिकांसाठी आता वांद्रे-खार पादचारी पूल तोडणार, पश्चिम रेल्वेवरील हार्बरचे वेळापत्रक ६ महिने विस्कळीत राहणार
14
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
15
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
16
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
18
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
19
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
20
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले

शिवजयंती, बसवेश्वर जयंती उत्साहात

By admin | Published: April 29, 2017 12:45 AM

शिवजयंती, बसवेश्वर जयंती उत्साहात

जिल्ह्यात शिवमय वातावरण : प्रतिमांचे पूजन, विशाळगड, पन्हाळा येथून शिवज्योतीचे आगमन, सामाजिक उपक्रम शिरोळ/अर्जुनवाड : जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर जयंती विविध मंडळांकडून मोठ्या उत्साहात साजरी करणेत आली. यानिमित्त ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे तसेच पुतळ््याचे पूजन मान्यवरांकडून करण्यात आले. गुरूवारी मध्यरात्रीपासून काही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी विशाळगड, पन्हाळ्यावरून शिवज्योत आणून त्याची मिरवणूक काढली होती. तसेच पोवाडे, भगवे झेंडे, पताक्यांनी परिसर भगवा बनला होता. सायंकाळी सजविलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून, आकर्षक विद्युत रोषणाईत, बैलगाड्या व ढोल-ताशांच्या निनादात शिवाजी महाराज व महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आल्या. रात्री उशिरापर्यंत या शोभायात्रा सुरू होत्या. शिरोळसह परिसरात शिवजयंती व बसवेश्वर जयंती विविध मंडळाकडून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांकडुन करण्यात आले. अर्जुनवाड येथील शिवाजी चौकात सार्वजनिक शिवजयंती मंडळाकडून कुमार कागवाडे यांच्या हस्ते मूर्तीपूजन झाले. त्याचबरोबर मराठा महासंघातील पूजन अशोक पाटोळे, संजय यादव यांच्यासह तरूण भारत मंडळ, छत्रपती शिवाजी मंडळ, शिवसेना शाखा, हनुमान चौकात प्रशांत कोळी व उस्मान मुल्ला यांनी शिवाजी महाराज व बसवेश्वर महाराज यांचे फोटो पूजन केले.ग्रामपंचायत कार्यालयातही शिवजयंती व बसवेश्वर जयंती करण्यात आली. याप्रसंगी अनुप पाटील, सागर पाटील, गजानन पाटील, राजू गुरव, अमर गायकवाड, विशाल सूर्यवंशी, संकल्प परीट यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.हेरवाड (ता. शिरोळ) येथील एकता चौकात सार्वजनिक शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी शिवज्योतीचे आगमन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पिंटू हुक्कीरे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. तसेच महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजनही करण्यात आले. यावेळी विकास माळी, श्रेणिक ढोणे, विशाल जाधव, सुरज नरगट्टे, सुशांत माळी, चव्हाण, अमीर नदाफ, अष्पाक नदाफ, निखिल कोरवी, दिलावर नदाफ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)