सागर शिंदेदिंडनेर्ली: डोक्यावरी कोल्हापुरी फेटा, एका हातात काठी घेऊन रायगडाची प्रत्येक पायरी चढताना हृदयामध्ये महाराजाच्या विषयी अपार प्रेम, आदर व मुखामध्ये शिवाजी महाराजांचा जयघोष करीत दिंडनेर्ली (ता.करवीर) येथील ७६ वर्षाच्या आऊ आजीने रायगड सर केला. आऊबाई भाऊ पाटील यांचा सळसळता उत्साह, जोश आजच्या तरुणाईला ही लाजवेल असाच होता. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये आजीचे छायाचित्रण सुरू होते तर आजी देत असलेल्या महाराजांच्या घोषणांनी येणाऱ्या जाणाऱ्यांना उत्साह मिळत होता.ज्या वयात मंदिरे, धार्मिक स्थळे तीर्थयात्रा करायची त्या वयात आऊबाईंनी १० किल्ले सर केले आहेत. मात्र, राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगड सर करतानाचे त्यांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.भगवा इथल्या रक्तात आहेशिवबा इथल्या भक्तांत आहेतिर्थ इथल्या नद्यांत वाहतेसमृध्दी इथल्या खोऱ्यात राहतेमराठमोळ्या संस्कृतीचा येथे सर्वांना आहे अभिमान..म्हणूनच आहे माझा महाराष्ट्र महान..या म्हणीचा सार्थ प्रत्यय येतोय तो माजी सरपंच श्रीमती आऊबाई भाऊ पाटील यांच्या बाबतीत. वास्तविक पाहता वृद्ध मंडळी मंदिरे तीर्थस्थळे आदी ठिकाणी जाण्याचा आग्रह करतात पण आऊबाई यांनी आपल्या मुलाकडे रायगडला जाण्याचा आग्रह केला. मग मुलानेही आईचा हट्ट पुरवला. यावेळी रायगड सर करताना आऊबाईचा उत्साह बघितला तर तरुणाईला लाजवणारा होता.आऊबाईंनी तीनवेळा सर केलाय रायगडहर हर महादेव.. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत आऊबाई पाटील यांनी आधीही तीनवेळा रायगड सर केला आहे. याच बरोबर प्रतापगड, सिंहगड, तोरणा, राजगड, सज्जनगड आदी किल्ले चालत गेल्या आहेत. त्यांचा हा जोश पाहून किल्ल्यावरती आलेले पर्यटक मोबाईल वरती त्याचे चित्रीकरण करून घेत. पर्यटन ठिकाणी घोडेस्वारी, उंट सफारी, रेसिंग कार, वॉटर बोट, फुटबॉल, क्रिकेट याचाही त्यांनी मनमुराद आनंद घेतला आहे. या सर्व आनंदी क्षणांचा व्हिडीओ नातवांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केले आहेत.दिंडनेर्ली गावच्या उपसरपंचआऊबाई पाटील या सन २०१४-१५ साली दिंडनेर्लीच्या उपसरपंच देखील होत्या. शेतीची त्यांना फार आवड आहे. त्या शेतामध्ये बैलाचे औत हाकतात तेही ओव्या, पोवाडे गात. शिवाजी राजेंचे पोवाडे अगदी खड्या आवाजात सादर करतात. त्यांचे हे व्हिडिओ पाहून सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
video डोक्यावर फेटा, हातात काठी घेऊन कोल्हापूरच्या ७६ वर्षाच्या आजीने सर केला रायगड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2022 2:40 PM