शिवसेना नगरसेवक अभिजीत चव्हाण यांच्याकडून मारहाण -कर्मचारी संतप्त; काम बंद
कोल्हापूर : महानगरपालिका पाणीपुरवठा विभागातील अभियंता अक्षय अटकर यांना शिवसेना नगरसेवक अभिजीत चव्हाण यांच्याकडून मारहाण झाली.या मारहाणीच्या प्रकारामुळे कर्मचारी संतप्त झाले असून त्यांनी काम बंद ठेऊन आंदोलन सुरु केले. महापालिका चौकात कर्मचा-यांची निदर्शने झाली. आपटेनगर पंपिंग स्टेशन येथे मारहाणीचा प्रकार घडला होता.