शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांना कर्नाटक पोलिसांनी घेतले ताब्यात, बेळगावमध्ये प्रवेश करताना कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2022 9:45 PM

Vijay Devane : भव्य निषेध मोर्चासाठी जाणारे कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख विजय देवणे यांना महाराष्ट्र कर्नाटक सीमा असणाऱ्या शिनोळी येथून पोलिसांनी ताब्यात घेतले.

- बाबासो हळिज्वाळेकोगनोळी : एक नोव्हेंबर हा कर्नाटक राज्य स्थापना दिवस सीमा भागातील मराठी बांधवांच्या वतीने काळा दिन म्हणून पाळण्यात येतो. या दिवशी काढण्यात येणाऱ्या भव्य निषेध मोर्चासाठी जाणारे कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख विजय देवणे यांना महाराष्ट्र कर्नाटक सीमा असणाऱ्या शिनोळी येथून पोलिसांनी ताब्यात घेतले.

काळया दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या वतीने बेळगाव मध्ये भव्य निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मराठी बांधवांना समर्थन देण्यासाठी प्रतिवर्षी कोल्हापूर शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते बेळगाव ला जाण्याचा प्रयत्न करतात. जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार कार्यकर्त्यांसह सोमवारी बेळगावच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी त्यांना कोगनोळी येथून कर्नाटक पोलिसांनी परत पाठवले. त्यानंतर त्यांनी मंगळवारी पुन्हा बेळगावच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला त्याही वेळी कोगनोळी येथील कर्नाटक पोलिसांनी त्यांना अडवून पुन्हा महाराष्ट्रात पाठवले.

त्यानंतर विजय देवणे व काही प्रमुख कार्यकर्त्यांनी खुश्कीच्या मार्गाने बेळगाव मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. ते खुशीच्या मार्गाने महाराष्ट्र कर्नाटक सीमा असणाऱ्या शिनोळी पर्यंत पोहोचले. या ठिकाणी अगोदरच मोठा पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला होता. या ठिकाणी पोलिसांनी पुढे जाण्यास मज्जाव केल्याने कार्यकर्ते व पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक झाली. कार्यकर्त्यांनी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. त्यानंतर पोलिसांनी विजय देवणे यांना कार्यकर्त्यांसह ताब्यात घेतले. काही वेळाने त्यांना महाराष्ट्राच्या दिशेने पाठविण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाKarnatakकर्नाटक