शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

फडणवीस टीम महाराष्ट्रात विष पेरते, सुषमा अंधारेंची घणाघाती टीका

By राजाराम लोंढे | Published: November 16, 2022 5:28 PM

उद्धवजींना पुन्हा सन्मानाने ‘वर्षा’वर पाठवणार

कोल्हापूर : भाजपने द्वेषाचं राजकारण सुरु केले असून ‘आफताब’ व ‘बिल्कीस बानोत’ प्रकरणात धर्म पाहून न्याय करणारी देवेंद्र फडणवीस व त्यांची टीम महाराष्ट्रात वीष पेरण्याचे काम करत असल्याची घणाघाती टीका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली. महिलांवर कमरेखालचे वार करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या बगलबच्यांना महाराष्ट्र माफ करणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बुधवारी कोल्हापूरात केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित केलेल्या महाप्रबोधन यात्रेत अंधारे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.अंधारे म्हणाल्या, राज्य व देशात भाजपने सगळे संशयाचे वातावरण तयार केले. जातीजातीमध्ये भांडणे लावून आपली राजकीय पोळी भाजताना महाराष्ट्र अधोगतीला निघाला याचे भान कोणाला नाही. महाराष्ट्रातील सात प्रकल्प बाहेर गेले. गुजरातला ‘ड्रीम’ सिटी बनवण्यासाठी मुंबईला दुबळी करण्याचा डाव आहे. महाराष्ट्राला भकास करुन लाखो तरुणांना बेरोजगार करण्याचे पाप मुख्यमंत्री शिंदे करत आहेत.

फडणीससाहेब तुमचे वजन आणि उंचीही माहिती आहेपंतप्रधान नरेंद्र मोदी टेलिप्रॉम्प्टरवर बोलतात आणि एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या चिठ्ठ्यांवर बोलतात. माझ्या उंचीवरुनही टीका करणारे देवेंद्र फडणवीस, तुमची उंची आणि वजनाही मला माहीती आहे. असा टोला अंधारे यांनी लगावला.उद्धवजींना पुन्हा सन्मानाने ‘वर्षा’वर पाठवणारराज्यातील सरकार हे विश्वासघाताने आल्याने ते फार काळ टिकणार नाही. त्यामुळे २०२३ मध्ये मध्यावधी निवडणूक लागतील. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी संयमाने ‘वर्षा’ निवासस्थान सोडले. त्यांना पुन्हा सन्मानाने ‘वर्षा’वर पाठवण्याची आम्ही शपथ घेतल्याने अंधारे यांनी सांगितले.मराठा नेतृत्वाला संपवण्याचा घाटछातीवर दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्री केल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील सांगतात, यावरुन मराठ्यांना मुख्यमंत्री करण्याची तयारी भाजपची नव्हती, हे सिध्द होते. नाईलास्तव मुख्यमंत्री केले, पण त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार द्यायचे नाही. त्यातून मराठ्यांकडे नेतृत्व करण्याची धमक नाही, हे दाखवण्याचा प्रयत्न भाजपचा सुरु असल्याचा आरोप अंधारे यांनी केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSushma Andhareसुषमा अंधारेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस