कोल्हापूर : शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात आशिष शेलार यांनी एकेरी उल्लेख करून अशोभनीय वक्तव्य केले. त्या निषेधार्थ बुधवारी शिवसेनेच्यावतीने बिंदू चौकात शेलार यांच्या पुतळ्याला काळे फासून निदर्शने करण्यात आली.
शेलार व त्यांच्या टोळीने भविष्यात ठाकरे कुटुंबीयांवर बोलताना खबरदारी घ्यावी; अन्यथा त्यांना शिवसैनिक रस्त्यावर फिरू देणार नाहीत, असा इशारा यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांनी दिला.या आंदोलनात माजी आमदार सुरेश साळोखे, सुजित चव्हाण यांच्यासह या आंदोलनात माजी आमदार सुरेश साळोखे, सुजित चव्हाण, शिवाजी जाधव, अवधूत साळोखे, हर्षल सुर्वे, राजू यादव, मंजित माने, दिलीप जाधव, विराज पाटील, दिलीप देसाई, राजू जाधव, रणजित आयरेकर, शशिकांत बिडकर, धनाजी यादव, विजय नाईक, शुभांगी साळोखे, स्मिता सावंत, दीपाली शिंदे, सुधा पाटील, मेघना पेडणेकर, आदी सहभागी झाले होते.क-हाडात जोडे मारलेक-हाड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या भाजप आमदार आशिष शेलार यांचा निषेध करत क-हाडात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बुधवारी तांच्या प्रतिमेला जोडे मारून जोरदार घोषणाबाजीही केली.येथील दत्त चौकात दुपारी एक वाजता शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंत शेलार, उपजिल्हाप्रमुख रामभाऊ रैनाक, तालुकाप्रमुख नितीन काशीद, शशिकांत हापसे, शहरप्रमुख शशिराज करपे आदिंच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.