गांधीनगर : कन्नडिकांनी शिवसेनेचे बेळगाव जिल्हाप्रमुख यांच्या वाहनावर केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून करवीर शिवसेनेच्यावतीने गांधीनगर बाजारपेठेतील दुकानांवरील कन्नड फलकांना काळे फासण्यात आले. यापुढे कन्नड फलक लावले तर दुकान मालकांच्या तोंडाला काळे फासू, असा इशाराही शिवसेना करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांनी दिला आहे. विशेष म्हणजे शिवसैनिकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर व्यावसायिकांनी तत्काळ आपले कानडी फलक उतरवले. गांधीनगर बाजारपेठेतील कन्नड फलक उतरवण्याच्या नोटीस संबंधित व्यावसायिकांना द्याव्यात अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला पोलीस व व्यापारी जबाबदार राहतील, असा इशाराही यादव यांनी दिला.
यावेळी उपतालुकाप्रमुख दीपक पाटील, कामगार सेना जिल्हाप्रमुख राजू सांगावकर, युवा सेनेचे सागर पाटील, संतोष चौगुले, दीपक पोपटानी, दीपक अंकल, सुनील पारपाणी, वीरेंद्र भोपळे, खेताजी राठोड, बाबुराव पाटील उपस्थित होते.
फोटो : १३ गांधीनगर बाजारपेठ
ओळ:- गांधीनगर व्यापारी पेठेतील दुकानांवरील कन्नड फलकांना शिवसेनेकडून काळे फासण्यात आले