चंदगड : निरोगी महाराष्ट्र घडविण्यासाठी शिव-संवाद दौऱ्याच्या माध्यमातून राज्य पिंजून काढत आहे. शिवसेनेची तरुण भगवी सत्ता येणार असून युवकांच्या हाताला रोजगार देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन शिवसेना युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.
शिनोळी (ता. चंदगड) येथे शिवसवांद दौºयानिमित्त महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. चंदगड तालुका शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे व महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात ५०० रुग्णांची तपासणी करण्यात आली.
ठाकरे म्हणाले, २०१९ च्या विधानसभेत शिवसेनेची सत्ता येणार आहे. ही सत्ता तरुणांची असेल. त्यासाठीच उद्याचा महाराष्ट्र घडविण्यासाठी तयारी सुरू असून यासाठीच शिवसंवाद दौºयाचे आयोजन सुरू आहे. राज्यात बेरोजगारी वाढली आहे. युवासेनेच्या माध्यमातून राज्यातील भगिनींसाठी स्व:संरक्षण प्रशिक्षण राबविणार आहे. युवकांनी शिवसेनेच्या पाठीशी उभे राहावे.
जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी आमदार शिवसेनेचा असेल, असा विश्वास व्यक्त केला. उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर यांनी स्वागत केले. यावेळी संपर्कप्रमुख अरुण दुधवाडकर, सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक, सुनील शिंत्रे, संग्रामसिंह कुपेकर, सरपंच नम्रता पाटील, बाळासाहेब पाटील, प्रकाश शिरोळकर, रजंना शित्रे, श्वेता नाईक, शांता जाधव, उपस्थित होते.प्रकाश आबिटकरांच्या कार्यालयाचे उद्घाटनआजरा : आजरा शहरात आमदार प्रकाश आबिटकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार आबिटकर यांच्या फंडातून शिवाजीनगर प्रभाग क्र. १ मध्ये पाच लाखांच्या रस्त्याचा कामाचा प्रारंभ ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ठाकरे यांनी आजरा शहराच्या व तालुक्याच्या विकासासाठी आबिटकरांच्या माध्यमातून शिवसेना प्रयत्नशील असल्याचे सांगितले.शिनोळी (ता. चंदगड) येथे महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रंसगी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख विजय देवणे, प्रभाकर खांडेकर, सुनील शिंत्रे, संग्राम कुपेकर, संजय मंडलिक, आदी उपस्थित होते.