शिवेसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांना धक्काबुक्कीसह कर्नाटक राज्यात महाराष्ट्रातील बसेसवर दगडफेकीचा प्रकार घडला. याचे पडसाद इचलकरंजीत उमटले. घटनेचा निषेध नोंदवत शहर शिवसेनेने रस्त्यातच कर्नाटकच्या बसेस अडविल्या. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करीत आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर घोषणाबाजी करीत आंदोलकांनी मुख्य बसस्थानकावर मोर्चा काढला. बसस्थानक प्रमुखांची भेट घेऊन महाराष्ट्रात कर्नाटकच्या बसेस चालणार नाही, असा इशारा दिला. त्यानंतर आंदोलकांनी कर्नाटक शासन आणि कन्नड वेदिका संघटनेच्या विरोधात घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. आंदोलनात उपजिल्हाप्रमुख महादेव गौड, वाहतूक सेना उपजिल्हा प्रमुख शिवानंद हिरेमठ, सागर कुराडे, सूरज जाधव, मेहबुब पठाण, बाळू आडाव यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
इचलकरंजीत शिवसेनेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 4:22 AM