लोकमत न्यूज नेटवर्क
कागल : बेळगाव येथे कन्नड रक्षिके वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मराठी भाषेतील फलकांना काळे फासल्याच्या घटनेला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेकडून शनिवारी येथील सीमा तपासणी नाक्यावर कर्नाटक राज्यातून येणाऱ्या वाहनांवर ‘जय महाराष्ट्र’चे फलक चिकटविण्यात आले. तसेच या नाक्यावरून कर्नाटक पासिंगची वाहने सोडू नयेत, त्यांना परत कर्नाटकात पाठवावे, असे निवेदनही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डाॅ. स्टिवन अल्वारीस यांना देण्यात आले.
कागल येथील तपासणी नाक्यावर शिवसैनिक एकत्र जमले. यावेळी घोषणा देत त्यांनी महामार्गावर कर्नाटक पासिंगची वाहने रोखून धरली. कन्नड भाषेत मजकूर लिहिलेल्या वाहनावर ‘जय महाराष्ट्र’ असे फलक यावेळी चिकटवण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत कन्नड भाषिक संघटना आणि कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला. पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
१३ कागल शिवसेना प्रोटेस्ट
फोटो कॅप्शन
: कोल्हापूर जिल्हा शिवसेनेकडून कागल येथे कर्नाटक पासिंग वाहनांवर ‘जय महाराष्ट्र’ असे फलक चिकटविण्यात आले. यावेळी विजय देवणे, संजय पवार, विद्या गिरी, शिवगोंडा पाटील, अशोक पाटील आदी उपस्थित होते.