कोल्हापूर : राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं पालकमंत्री चंद्रकांत पाटील शाहू जन्मस्थळी येऊन महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केले. मात्र, चंद्रकांत पाटील शाहू जन्मस्थळी पोहोचण्यापूर्वीच सकाळी 7 वाजल्यापासून शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते दाखल झाले होते. चंद्रकांत पाटील तेथे पोहोचताच शिवसैनिकांनी घोषणाबाजी सुरू केली.
शाहू महाराजांविषयीचे अनेक प्रकल्प अर्धवट असल्याने प्रवेशव्दाराजवळच जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होते. पालकमंत्री आल्यानंतर त्यांनी सुरूवातीला तेथील शाहू पुतळ्यास अभिवादन केले व आंदोलकांशी चर्चा केली. रखडलेले जन्मस्थळाचे काम, राधानगरी धरणावरील विद्युतनिर्मीती केंद्राची सुरूवात, शाहू मिल येथे गारमेंट पार्क, महाराजांची समाधी, महाराजांनी प्रवास केलेली बोगी याबाबत पवार आणि देवणे यांनी विचारणा केली.
अर्धवट प्रकल्पांबाबत गती देण्याच्या सुचना करू आणि शाहू मिलच्या जागेवरील प्रकल्पाबाबत २0 जुलैनंतर बैठक घेण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. यावेळी कमलाकर जगदाळे, शशी बिडकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.