कोल्हापूर : केंद्र सरकारने लादलेल्या कृषी विधयेकाविरोधात मंगळवारी ‘भारत बंद’ची हाक दिली होती. शिवसेनेच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा देत शहरातून भगवी रॅली काढली. मोटारसायकलवरून शिवसैनिकांनी सर्व व्यावसायिकांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. केंद्र सरकारचा निषेध करीत ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा देण्यात आल्या.
उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (दि. ७) शिवसैनिकांना या ‘बंद’मध्ये सहभागी होण्याचे आदेश दिले हाेते. यानुसार कोल्हापुरातील शिवसेनेच्या वतीने सकाळी शहरातून मोटारसायकल रॅलीकडून केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी शिवसैनिकांनी हातांत भगवे झ्रेंडे, भगव्या टोप्या, गळ्यात मफलर घातले होते.
चौकट
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या मार्गदर्शनाखाली भवानी मंडप येथून दुचाकी रॅलीला सुरुवात झाली. मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, शिवाजी चौक, महाराणा प्रताप चौक, फोर्ड कॉर्नर, व्हीनस कॉर्नर, दाभोळकर कॉर्नर, मध्यवर्ती बसस्थानक, परीख पूल, राजारामपुरी, उमा टॉकीजमार्गे रॅली बिंदू चौक़ येथे आल्यावर तिची सांगता झाली. यावेळी सुजित चव्हाण, अवधूत साळोखे, हर्षल सुर्वे, विनायक साळोखे, विराज पाटील, विनोद खोत, दिनेश परमार, मंजित माने, रणजित आयरेकर, धनाजी यादव, दिलीप जाधव, संजय जाधव, आदी उपस्थित हाेते.
चौकट
शिवसेनेचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली शनिवार पेठ, सोन्यामारुती चौक येथील शिवसेना शहर कार्यालयातून भगव्या रॅलीला सुरुवात झाली. यावेळी सीपीआर चौक, शिवाजी चौक, दसरा चौका, व्हीनस कॉर्नर, लक्ष्मीपुरीमार्गे बिंदू चौक येथे सांगता झाली. यावेळी जयवंत हारुगुले, सुनील जाधव, दीपक गौड, बाळासाहेब पोवार, किशोर घाटगे, सुशील भांदिगरे, दीपक चव्हाण, सुनील खोत, सागर साळोखे, पीयूष चव्हाण, तुकाराम साळोखे, रणजित जाधव, अमित चव्हाण, केतन शिंदे, आदी उपस्थित हाेते.
चौकट
पक्ष एक, रॅली दोन
शिवसेनेच्या वतीने शहरातून दोन रॅली काढण्यात आल्या. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर गटाच्या वतीने एक; तर जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांच्या वतीने दुसरी रॅली काढण्यात आली. ‘पक्ष एक आणि रॅली दोन’ अशी चर्चा सुरू होती.
फोटो : ०८१२२०२० कोल शिवसेना रॅली एक
ओळी : कोल्हापुरात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत बंद’ला पाठिंब्यासाठी दुचाकी रॅली काढण्यात आली.
फोटो : ०८१२२०२० कोल शिवसेना रॅली दोन
ओळी : शिवसेनेचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली शहरातून दुचाकी रॅली काढून ‘भारत बंद’चे आवाहन करण्यात आले.
बातमीदार : विनोद