लोकमत न्यूज नेटवर्क
अणुस्कुरा : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शाहूवाडी तालुक्यामध्ये शिवसेनेचा भगवा फडकला आहे. शाहूवाडीच्या दक्षिण भागामध्ये पेंडाखळे, नांदारी, नांदगाव, बुरंबाळ या गावांमध्ये एकहाती शिवसेना तर मोसम, मांजरे या दोन गावांमध्ये सत्तांतर होऊन जनसुराज्य व काँग्रेस आघाडीची सत्ता प्रस्थापित झाली आहे. कुंभवडे , अणौस्कुरा या ठिकाणी बिनविरोध शिवसेनेची सत्ता स्थापन झाली आहे. पंचायत समिती सदस्य पांडुरंग पाटील यांनी पुन्हा एकदा आपले नेतृत्व सिद्ध केले. प्रत्येक गावातील निवडून आलेले सदस्य खालील प्रमाणे:-
पेंडाखळे : शिवसेना गट: प्रकाश राऊत, मंगल वरंडेकर,राधिका सुतार, उज्ज्वला पाटील, सारिका पाटील,योगेश पाटील. जनसुराज्य गट :- रेश्मा कांबळे , विश्वास कांबळे , बुधाजी लोहार.
बुरंबाळ : शिवसेना गट : अशोक बारस्कर, मारुती पाटील, अविनाश कांबळे, शोभा पाटील ,योगिता शिंदे .
जनसुराज्य गट ; सुवर्णा पाटील ,लक्ष्मी कस्तुरे
मोसम :जनसुराज्य गट : संचिता साबळे, अमृता लाड, गीतांजली कांबळे, मानसी गांगण, जगदीश पाथरे.
शिवसेना गट : रामविजय मापुस्कर, प्रतिभा नारकर
नांदारी : शिवसेना गट : गौरी कांबळे ,बाजीराव पाटील, विक्रम विचारे, शारदा गुरव.
जनसुराज्य गट : सुरेश पाटील, अर्चना पाटील, धोंडूबाई लांबोरे
नांदगाव : शिवसेना गट : श्रीपतराव गुरव, शालाबाई लाड ,सरिता पाटील , अरुण कांबळे, गीता गुरव
जनसुराज्य गट : शुभांगी खराडे, आंनदा खराडे.