शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

शिवप्रसादचा शैक्षणिक प्रवास खडतर-प्रदर्शनाच्या पैशांतून शिक्षण केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 12:09 AM

‘पुराणतत्व’ या विषयाच्या पदवीधर शिक्षणासाठी अर्थिक कोंडमाऱ्याशी धडपडणाºया पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील शिवप्रसाद सुनील शेवाळे याचा शैक्षणिक प्रवास खडतर बनत आहे.

ठळक मुद्देएैतिहासिक पुराणतत्व पदव्युत्तर (एम. ए.) अभ्यासासाठी प्रवेशपात्र दोघांपैकी ‘शिव’च्या शिक्षणाचे भवितव्य अर्थिक पाठबळावर ठरणार.-दुशाळगडच्या पाऊलखुणाचा शोध

सरदार चौगुले ।पोर्ले तर्फ ठाणे : ‘पुराणतत्व’ या विषयाच्या पदवीधर शिक्षणासाठी अर्थिक कोंडमाऱ्याशी धडपडणाºया पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील शिवप्रसाद सुनील शेवाळे याचा शैक्षणिक प्रवास खडतर बनत आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील एैतिहासिक पुराणतत्व पदव्युत्तर (एम. ए.) अभ्यासासाठी प्रवेशपात्र दोघांपैकी ‘शिव’च्या शिक्षणाचे भवितव्य अर्थिक पाठबळावर ठरणार.

शेवाळे कुटुंबाच्या वाट्याला पोटापुरतीही शेती नसल्याने, आईला रोज एकाच्या बांधावर रोजगार करावा लागतो. त्यातून मिळणाºया पैशांतून घरखर्च चालवत त्यातल्याच पैशाला गाठीला गाठ करून, मारून शिवचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. कारण वडील घर सोडून गेल्यामुळे घरची जबाबदारी आईने मनगटाच्या हिंमतीवर पेलली. तसे शिवचे बालपण आजोळी बाबंरवाडीत गेले. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर शिवने पदवीपर्यंतचे शिक्षण स्वामी विवेकानंद कॉलेजमधून इतिहास विषयातून पूर्ण केले.

गडकोट किंवा पुराणतत्वातील एैतिहासिक घटना, पुरावे लोकांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी किंवा त्यांच्यातील बारकावे शोधण्यासाठी पुराणतत्व या विषयावर पदव्युत्तर शिक्षणाची गरज आहे; परंतु या शिक्षणासाठी घरची परिस्थिती अडथळा बनून येत आहे. पुणे येथील डेक्कन कॉलेजमध्ये अभ्यासक्रमासाठी साधारण तीन लाखांच्या आसपास खर्च येणार आहे. तो अर्थिक पाठबळाच्या आशेवर अवलंबून आहे.दुशाळगडच्या पाऊलखुणाचा शोधवाचणातून ऐतिहासिक विषयाबद्दल आकर्षण निर्माण झालेल्या शिवप्रसादने साखरप्याजवळ पौराणिक दुशाळगडच्या पाऊलखुणाचा शोध लावला. त्याला असणाºया गडकोटाच्या आकर्षणातून पानवेलीत झाकळलेला व दुर्लक्षित असणारा दुशाळगड लोकांच्या नजरेसमोर आणणे शक्य झाले. त्याला गडकोटाच्या बाह्यांगाची माहिती लोकांच्यापर्यंत पोहोचविण्याची प्रबळ महत्त्वाकांक्षा आहे. त्यासाठी त्याला पुरातत्व पदव्युत्तरचे शिक्षण पूर्ण करणे गरजेचे आहे.

प्रदर्शनाच्या पैशांतून शिक्षण केलेशिवने आठवीत असताना पाच वर्षे दोन तासांची दीड हजार रुपये पगाराची माळ्याची नोकरी केली. पाचशे रुपये घरखर्चाला, बाकीच्या पैशात किल्ला बघणे, पुस्तके खरेदी करण्यासाठी वापरले. जुनी नाणी, शस्त्रे, दुर्मीळ पुस्तके जमा करून त्यांचे महाराष्ट्रात प्रर्दशन भरवून त्यातून मिळणाºया पैशातून पदवीचा शिक्षण खर्च भागविला; परंतु पदव्युत्तरचे शिक्षण शिवच्या आवाक्याबाहेरचा असल्याने त्यांची कसोटी लागणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरEducationशिक्षण