शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

पर्यायी पुलालाही शिवाजी महाराजांचे नाव

By admin | Published: December 17, 2015 12:46 AM

करवीर पंचायत समिती सभा : ठराव मंजूर; विविध विषयांवर खडाजंगी

कसबा बावडा : शिवाजी पुलाशेजारीच नवीन पर्यायी पूल बांधण्याचे काम सुरू आहे. या पुलालाही छत्रपती शिवाजी पूल असेच नाव देण्यात यावे, असा ठराव करवीर पंचायतीच्या मासिक सभेत मंजूर करण्यात आला. तानाजी आंग्रे यांनी याबाबतचा ठराव मांडला होता. अध्यक्षस्थानी सभापती सुवर्णा बोटे होत्या. सभेत विविध विषयांवर जोरदार खडाजंगी झाली. यावेळी सहायक गटविकास अधिकारी एस. व्ही. केळकर यांनी विविध प्रश्नांची उत्तरे दिली.नवीन पर्यायी शिवाजी पुलाला त्यांचे काम पूर्ण होण्याआधीच कोणाचे नाव द्यायचे, याची चर्चा सुरू झाली आहे. महापालिका, पुरातन विभाग, वनविभाग अशा विविध विभागांच्या मंजुरीबाबत या पुलाचे काम रखडले आहे. ते पूर्ण होण्याच्या हालचाली होत नसतानाच या पुलाला कोणाचे नाव द्यायचे, यावरून राजकारण होत असल्याचा आरोप तानाजी आंग्रे व राजेंद्र सूर्यवंशी यांनी केला.सध्या आहे त्या पुलाची मुदत संपत आली आहे. काम रखडल्याने पुलाचा खर्च वाढणार आहे. हा खर्च संबंधित अधिकाऱ्यांकडून भरून घ्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.तालुक्यात इंदिरा आवास योजनेचा बट्याबोळ उडाला असल्याचा आरोप करण्यात आला. घरकुल योजनेसाठी ९८ पात्र लाभार्थी होते. त्यापैकी ४७ जणांना मंजुरी देण्यात आली. नंतर मात्र प्रशासनाने काही तांत्रिक कारणे सांगून हे काम थांबविले आहे. त्याला जबाबदार कोण? असा सवाल दिलीप टिपुगडे, राजेंद्र सूर्यवंशी, तानाजी आंग्रे यांनी केला. करवीरच्या शिक्षण विभागाने तालुक्यातील सर्व १८४ शाळा ‘ज्ञानरचनावादी’ करण्याचा निर्धार केला आहे. शिक्षकांना विश्वासात घेऊन सकारात्मक वृत्तीने १0५ शाळा रचनावादी झाल्या असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी रवींद्र चौगले, विश्वास सुतार व एस. के. यादव यांनी सभागृहात दिली. तालुक्यात ३0 अंगणवाड्या मंजूर झाल्या असून, त्यासाठी सहा लाखांचा आणखीन जास्त निधी मंजूर झाल्याची माहिती बांधकामचे कार्यकारी अभियंता जे. डी. यादव यांनी दिली. पाचगावमधील २४ कॉलन्यांना कार्पोरेशनचे पाणी दिले असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे एन. एम. देसाई यांनी सांगितले. स्मिता गवळी यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. करवीरची आणेवारी ५0 टक्क्यांपेक्षा कमी नसल्याने जलयुक्त शिवार योजनेत तालुक्यातील एकाही गावाचा समावेश होत नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. जलयुक्त शिवाराचे निकष बदलावेत, अशी सूचना राजेंद्र सूर्यवंशी यांनी केली. सहायक गटविकास अधिकारी एस. व्ही. केळकर यांनी प्रश्नांची उत्तरे दिली. अधिकारी फोन घेत नाहीत... : बाहेरील गाड्यांचे पार्किंगपंचायतीचे अधिकारी सदस्यांचे फोन घेत नाहीत, अशी तक्रार भुजगोंडा पाटील यांनी केली. यावर असा प्रकार झाल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल, असे सभापती सुवर्णा बोटे यांनी सुनावले.पंचायत समितीच्या आवारात बाहेरील लोक आपली वाहने पार्क करतात. त्यामुळे सदस्यांची वाहने पार्क करताना जागा मिळत नाही, अशी तक्रार भुजगोंडा पाटील व सचिन पाटील यांनी केली