एकदा बालगोपाल विरुद्ध शिवाजी या संघांत अत्यंत चुरशीचा सामना होता. त्यात अशोकचा मिडफिल्डचा खेळ अफलातून झाला. सामना ‘शिवाजी’ने जिंंकला. चाहत्यांनी अशोकला उचलून घेतले व शहरातून विजयोत्सव मिरवणूक काढली. अशोक चव्हाण याचा जन्म दि. ७ जुलै १९४७ रोजी गंजी गल्ली, सोमवार पेठ, येथे झाला. लहानपणापासूनच मोठ्यांचा खेळ पाहण्याची उत्कट इच्छाशक्ती. त्यामुळे गल्लीबोळांतील रोज होणाऱ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन अशोक फुटबॉलमध्ये बॅकच्या प्लेसवर तयार होऊ लागला. काका ‘शिवाजी’चे सुप्रसिद्ध खेळाडू. लेप्टआऊट कै. जयसिंंग शं. खांडेकर व कोल्हापूरचे प्रथम महापौर कै. बाबासाहेब कसबेकर, कै. सखारामबापू खराडे यांच्या मार्गदर्शनामुळे व प्रोत्साहनामुळे अशोक चव्हाण याचा फुटबॉल प्रकाशात आला. वयाच्या सातव्या वर्षापासून फुटबॉल खेळण्यास सुरुवात करून तब्बल २१ वर्षे अशोकला फुटबॉल खेळण्याची मौलिक संधी मिळाली. जयसिंग खांडेकरच्या प्रेरणा व मार्गदर्शनामुळे अशोक शिवाजी तरुण मंडळाच्या सीनिअर संघात सेंटर हाफ या जागेवर दाखल झाला.अशोक चव्हाण एक रूबाबदार व्यक्तिमत्त्व, गोरा रंग, गोलसर चेहरा, माफक उंची, मजबूत हाडपेर, शरीर प्रकृती दणकट. खेळातील सर्व तंत्रे जाणणारा, सेंटर बॅकवर खेळताना नेहमी सतर्क राहून आपल्या सवंगड्यांना बॉल पास करणारा. बॉल कंट्रोलिंंग अचूक. शिवाय बॉलवर हुकूमत प्रभावी. जोरदार किक्स मारण्याची खासियत. ग्राऊंड पासिंंग किंंवा ओव्हरहेड लाँग पासिंंगमध्ये परफेक्ट खेळाडू. पायात कमालीची ताकद. स्टॅमिना व धावगती पुरेपूर.शिवाजी तरुण मंडळातून खेळताना स्थानिक पातळीवर होणाऱ्या सर्व स्पर्धा खेळून परगावच्या सांगली, मिरज, गडहिंंग्लज, गारगोटी याठिकाणी अशोकने सेंटर बॅकचा प्रेक्षणीय खेळ व कोल्हापूरचे पाणी दाखवून अनेक स्पर्धा जिंंकल्या आणि तेथील प्रेक्षकांकडून वाहवा मिळविली. अशोकच्यावेळी त्याचे साथीदार मातब्बर होते. फुटबॉलशिवाय अशोकने (अॅथलेटिक) रनिंंग स्पर्धेत भाग घेऊन अनेकवेळा प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले होते. या रनिंंगमध्ये भाग घेतल्याचा फायदा अशोकचे फुटबॉल स्पर्धांतील रनिंंग अधिक वेगवान असे. त्यामुळे बॉल ड्रिबलिंंगच्यावेळी अशोक इतर प्रतिस्पर्धी खेळाडूवर मात करत असे. सामना खेळत असताना त्याच्या उजव्या पायास गुडघ्यावर फ्रॅक्चर झाले होते. त्या काळात अशा दुखापत झालेल्या खेळाडूंचे पाय चोळून बरे करण्याची किमया शिवाजी रोडवर (बिंंदू चौकनजीक) असणाऱ्या बारगीर वस्ताद यांना अवगत होती. कोल्हापुरातील व बाहेरगावच्या कित्येक खेळाडूंचे दुखरे पाय त्यांनी बरे केले आहेत. अशोक चव्हाण याचा पाय पूर्णपणे बारगीर वस्ताद यांनी बरा केला. अशोक चव्हाण आपल्या कारकिर्दीतील एक आठवण सांगताना हरवून जातो. एकदा बालगोपाल विरुद्ध शिवाजी या संघांत सामना होता. अत्यंत चुरशीचा. त्यात अशोकचा मिडफिल्डचा खेळ अफलातून झाला. सामना ‘शिवाजी’ने जिंंकला. मित्रांनी व चाहत्यांनी अशोकला उचलून घेतले व शहरातून विजयोत्सव मिरवणूक काढली. अशोकचा मित्रपरिवार मोठा. शाहू मैदानावर सामने पाहण्याची त्याची खूप इच्छा असते; पण दुर्दैवाने तो पक्षाघातासारख्या आजाराने आज अपंग आहे. ही त्याची शोकांतिका आहे; पण मन मात्र उत्साही आहे. (उद्याच्या अंकात : अनंत खांडेकर)प्रा. डॉ. अभिजित वणिरे
शिवाजी मंडळाचा दमदार सेंटर हाफ--अशोक चव्हाण
By admin | Published: February 21, 2017 11:55 PM