शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

‘शिवाजी’ पुढील फेरीत

By admin | Published: March 23, 2015 12:47 AM

दसरा कप फुटबॉल स्पर्धा : कोल्हापूर पोलीस टायब्रेकरवर पराभूत

कोल्हापूर : शिवाजी तरुण मंडळाने कोल्हापूर पोलीस संघाचा ४-३ असा टायब्रेकरवर पराभव करत दसरा कप फुटबॉल स्पर्धेची पुढील फेरी गाठली. छत्रपती शाहू स्टेडियम येथे रविवारी शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध कोल्हापूर पोलीस संघ यांच्यात झालेल्या सामन्यात प्रारंभापासून ‘शिवाजी’चेच वर्चस्व होते. यामध्ये स्वप्निल पाटील, मंगेश भालकर, वैभव राऊत, चिंतामणी राजवाडे, प्रमोद राऊत यांनी खोलवर चढाया करत पोलीस संघावर दबाव निर्माण केला. तिसऱ्या मिनिटास प्रमोद राऊतच्या पासवर स्वप्निल पाटीलने गोलची नोंद करत आपल्या संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. एक गोलचे ओझे घेऊन खेळणाऱ्या पोलीस संघाकडून विनायक चव्हाण, सोमनाथ लांबोरे, सागर भोसले, युक्ती ठोंबरे, अमोल चौगुले, रोहित ठोंबरे यांनी सामना बरोबरीत आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र, त्यांचे प्रयत्न सजग शिवाजी तरुण मंडळाच्या बचावफळीने निष्प्रभ ठरविले. ‘शिवाजी’च्या अमृत हांडेने मोठ्या डीमध्ये चेंडू हाताळला. याबद्दल पोलीस संघास पंच राजू राऊत यांनी पेनल्टी बहाल केली. यावर पोलीस संघाच्या विनायक चौगलेने आयती आलेली गोल करण्याची संधी बाहेर फटका मारून वाया घालवली. उत्तरार्धात ‘शिवाजी’कडून चिंतामणी राजवाडे याने आघाडी वाढविण्याची आलेली सोपी संधी वाया घालवली. ५९ व्या मिनिटास पोलीस संघाच्या सागर भोसलेने कॉर्नर किकद्वारे दिलेल्या पासवर रोहित ठोंबरेने गोल नोंदवत सामन्यात १-१ अशी बरोबरी आणली. अखेरपर्यंत १-१ अशी बरोबरी राहिल्याने सामन्याचा निकाल पंचांनी टायब्रेकरवर लावण्याचा निर्णय घेतला. ‘शिवाजी’कडून अमृत हांडे, आकाश भोसले, वैभव राऊत, संदीप पोवार, तर पोलीस संघाकडून संतोष तेलंग, सागर भोसले, सोमनाथ लांबोरे यांनी गोल नोंदवले. शुभम संकपाळ, युक्ती ठोंबरे यांचे फटके वाया गेल्याने हा सामना शिवाजी मंडळाने ४-३ असा जिंकला.