शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

‘शिवाजी’, प्रॅक्टिस ‘ब’ विजयी अटल चषक फुटबॉल स्पर्धा : अक्षय सरनाईकची स्पर्धेतील पहिली हॅट्ट्रिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:49 AM

कोल्हापूर : नेताजी तरुण मंडळ व ‘केएसडीए’तर्फे आयोजित केलेल्या अटल चषक फुटबॉल स्पर्धेत अक्षय सरनाईकच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर शिवाजी तरुण मंडळाने नवख्या ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ फुटबॉल

कोल्हापूर : नेताजी तरुण मंडळ व ‘केएसडीए’तर्फे आयोजित केलेल्या अटल चषक फुटबॉल स्पर्धेत अक्षय सरनाईकच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर शिवाजी तरुण मंडळाने नवख्या ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ फुटबॉल संघाचा ४-० ने, तर प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘ब’ने संध्यामठ तरुण मंडळाचा १-० असा सडनडेथवर पराभव केला.शाहू स्टेडियमवर शुक्रवारी दुपारी दोन वाजता प्रॅक्टिस ‘ब’ व संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात सामना झाला. ‘प्रॅक्टिस’कडून रोहित भोसले, रजत जाधव; तर ‘संध्यामठ’कडून आशिष पाटील, सागर भालकर, रोहित पौंडकर यांनी आक्रमक चाली रचल्या. मात्र, त्यांना पूर्वार्धाच्या शेवटपर्यंत आघाडी घेता आली नाही.उत्तरार्धात ७०व्या मिनिटाला ‘पॅ्रक्टिस’कडून आकाश मायणेने गोल करीत संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. ७२ व्या मिनिटाला ‘संध्यामठ’च्या अक्षय पाटीलने गोल करीत सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. संपूर्ण वेळेत हीच स्थिती राहिल्याने पंचांनी ट्रायब्रेकरचा अवलंब केला. ‘प्रॅक्टिस’कडून रोहित भोसले, ओंकार भुर्के, चेतन डोंगरे, आकाश मायणे यांनी, तर ‘संध्यामठ’कडून आशिष पाटील, सागर भालकर, रोहित मंडलिक, रोहित पौंडकर यांनी गोल केले. त्यामुळे पुन्हा ४-४ची बरोबरी झाली. यानंतर सडनडेथचा अवलंब केला. यात ‘प्रॅक्टिस’कडून रजत जाधवने, तर ‘संध्यामठ’कडून अजिंक्य गुजरने गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली. ‘प्रॅक्टिस’कडून श्लोक साठमने गोल केला; तर सिद्धार्थ कुºहाडेचा फटका गोलरक्षकाने अडविला. हा सामना १-० असा सडनडेथवर जिंकत प्रॅक्टिस क्लब ‘ब’ने पुढील फेरी गाठली.दुसऱ्या सामन्यात ‘शिवाजी’च्या अक्षय सरनाईकने सहाव्या व आठव्या मिनिटाला, तर उत्तरार्धाच्या सुरुवातीला ४२ व्या मिनिटाला गोल करीत स्पर्धेतील पहिली हॅट्ट्रिक नोंदवली. ‘ऋणमुक्तेश्वर’कडून चिंतामणी राजवाडे, तुषार पुनाळकर, अमित दुर्गुळे यांनी चांगला खेळ केला; पण योग्य समन्वय न राखता आल्याने गोल करता आले नाहीत. सामन्याच्या जादा वेळेत मिळालेल्या संधीवर अभिषेक सावंतने केलेल्या गोलच्या जोरावर ‘शिवाजी’ने ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ फुटबॉल संघाचा ४-० ने पराभव केला.लढवय्या खेळाडू - तुषार पुनाळकर (ऋणमुक्तेश्वर), आशिष पाटील (संध्यामठ)सामनावीर - अक्षय सरनाईक (शिवाजी), आकाश मायणे (प्रॅक्टिस ‘ब’)आजचे सामनेदु. २ वा. : साईनाथ स्पोर्टस विरुद्ध कोल्हापूर पोलीस संघदु. ४ वा. : खंडोबा ‘अ’ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ ‘ब’अटल चषक फुटबॉल स्पर्धेत शिवाजी तरुण मंडळ व ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ संघांत शुक्रवारी झालेल्या सामन्यातील एक अटीतटीचा क्षण.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFootballफुटबॉल