शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

शिवाजी विद्यापीठात दुसऱ्या दिवशीही लेखणी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 4:57 PM

विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिवाजी विद्यापीठातील सेवकांचे लेखणी आणि अवजार बंदसह ठिय्या आंदोलन शुक्रवारी सुरू राहिले. सेवकांनी विद्यापीठातील विविध अधिकाऱ्यांच्या कक्षाबाहेर ठिय्या मारला. दरम्यान, ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या अंतिम सत्र, वर्षाच्या परीक्षा लक्षात घेता हे आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन उच्च शिक्षण संचालकांनी केले असल्याचे संदेश सोशल मीडियावरून प्रसारित झाले आहेत.

ठळक मुद्दे शिवाजी विद्यापीठात दुसऱ्या दिवशीही लेखणी बंदकामकाज ठप्प :आंदोलन मागे घेण्याचे शिक्षण संचालकांचे आवाहन

कोल्हापूर : विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिवाजी विद्यापीठातील सेवकांचे लेखणी आणि अवजार बंदसह ठिय्या आंदोलन शुक्रवारी सुरू राहिले. सेवकांनी विद्यापीठातील विविध अधिकाऱ्यांच्या कक्षाबाहेर ठिय्या मारला. दरम्यान, ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या अंतिम सत्र, वर्षाच्या परीक्षा लक्षात घेता हे आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन उच्च शिक्षण संचालकांनी केले असल्याचे संदेश सोशल मीडियावरून प्रसारित झाले आहेत.सातवा वेतन आयोग, सुधारित आश्वासित प्रगती योजना पुनर्जीवित करणे, आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समिती आणि शिवाजी विद्यापीठ सेवक संघाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन गुरुवारपासून सुरू आहे.

दुसऱ्या दिवशी सेवकांनी कुलगुरू, कुलसचिव, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, वित्त व लेखा अधिकारी यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या जागेवर बसून लेखणी बंद आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला. त्यामुळे विद्यापीठाचे कामकाज ठप्प झाले. 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर