कोल्हापूर : पारंपरिक पद्धतीने शिक्षण सुरू नसल्याने शैक्षणिक गुणवत्ता ढासळत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ते टाळण्यासाठी शिवाजी विद्यापीठ परिसर आणि सर्व महाविद्यालये तत्काळ पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) सुरू करावीत, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) मंगळवारी केली. त्याबाबतचे निवेदन अभाविपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले.सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याच्या कारणास्तव विद्यापीठ परिसर आणि सर्व महाविद्यालये ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यास विद्यापीठ प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत विद्यापीठात ह्यउच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ कोल्हापूर हा उपक्रम राबविण्यात आला.
त्यावेळी कोविडच्या नियमांचा फज्जा उडाला. या दुटप्पी भूमिकेचे अभाविप निषेध करते. या कार्यक्रमाच्या आयोजकांवर कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करावी. विद्यापीठ परिसर आणि महाविद्यालये तत्काळ सुरू करावीत, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती अभाविपचे कोल्हापूर महानगरमंत्री ऋषिकेश माळी यांनी दिली.कुलगुरू, कुलसचिवांवर कारवाई कराजिल्हा प्रशासनाने कोविड प्रतिबंधात्मक नियमांबाबतच्या सूचना देऊनही विद्यापीठ आरोग्यधिकारी यांना त्याबाबतच्या सूचना दिल्या नसल्याच्या कारणास्तव कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू पी. एस. पाटील, कुलसचिव विलास नांदवडेकर, आरोग्यधिकारी यांच्यावर शासन आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.