शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

सलग दुसऱ्या वर्षी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ ऑनलाइन, जीवशास्त्रज्ञ दिनकर साळुंखे प्रमुख पाहुणे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2022 12:47 PM

राष्ट्रपती सुवर्णपदक आणि कुलपती मेडल विजेत्या विद्यार्थ्यांची घोषणा येत्या दोन दिवसांत होणार

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी शिवाजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. शनिवारी (दि. ५ मार्च) सकाळी अकरा वाजता होणाऱ्या या समारंभाचे जीवशास्त्रज्ञ डॉ. दिनकर साळुंखे प्रमुख पाहुणे असणार आहेत. अध्यक्षस्थानी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, तर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत प्रमुख उपस्थित असणार आहेत.५८ व्या दीक्षांत समारंभांची विद्यापीठाकडून तयारी सुरु आहे. यासाठी ऑनलाइन उपस्थित राहण्याबाबत राज्यपाल कोश्यारी, मंत्री सामंत आणि जीवशास्त्रज्ञ साळुंखे यांनी विद्यापीठाला कळविले आहे. त्यानुसार विद्यापीठाने शनिवारी समारंभ घेण्याचे नियोजन केले आहे.प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे जीवशास्त्रज्ञ डॉ. साळुंखे हे नवी दिल्लीतील इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजीचे संचालकपदी कार्यरत आहेत. त्यांनी मॉलिक्युलर बायोटेक्नॉलॉजी विषयातून पीएच.डी.चे संशोधन केले आहे. त्यांचा सन २००० मध्ये शांतीस्वरूप भटनागर विज्ञान आणि तंत्रज्ञान पुरस्काराने सन्मान झाला आहे. त्यांचा जन्म बेळगावमध्ये झाला असून, धारवाडमधील कर्नाटक विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

६० हजार विद्यार्थ्यांचे अर्जदरम्यान, यावर्षी पदवी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सुमारे ६० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. राष्ट्रपती सुवर्णपदक आणि कुलपती मेडल विजेत्या विद्यार्थ्यांची घोषणा येत्या दोन दिवसांत विद्यापीठाकडून होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठ