कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातर्फे विविध अभ्यासक्रमांच्या उन्हाळी सत्रातील परीक्षा आज, मंगळवारपासून सुरू होणार आहेत. या सत्रात एकूण ६४० परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षा ५६ दिवसांत घेण्याचे नियोजन विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केले आहे.बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बीबीए., बीसीए., अशा विविध अभ्यासक्रमांच्या एक ते सहा सत्रांतील परीक्षा उन्हाळी सत्रामध्ये होणार आहेत. विद्यापीठ संलग्नित कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील एकूण २८३ महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्रे असणार आहेत.
या केंद्रांवर चार टप्प्यांमध्ये परीक्षा होतील. एम. एड्. एम.ए.. शिक्षणशास्त्र, शारीरिक शिक्षण आदी विषयांच्या प्रश्नपत्रिका ‘एसआरपीडी’ प्रणालीद्वारे पाठविण्यात येणार आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळातर्फे परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान, एका दिवसावर परीक्षा येऊन ठेपली असल्याने सोमवारी आपआपल्या नियोजनानुसार अभ्यास करून अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींनी रंगपंचमी साजरी केली.
२२ ते २४ एप्रिलदरम्यान परीक्षा नाहीलोकसभा निवडणुकीमुळे विद्यापीठाने उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. त्यानुसार दि. २२ ते २४ एप्रिल या कालावधीत विद्यापीठाची कोणतीही परीक्षा होणार नाही. या परीक्षा वेळापत्रकाच्या शेवटी होणार आहेत.
आकडेवारी दृष्टिक्षेपात
- उन्हाळी सत्रात होणाऱ्या एकूण परीक्षा : ६४०
- एकूण परीक्षार्थी : २ लाख ९० हजार
- परीक्षा केंद्रे : २८३
शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा आजपासूनउन्हाळी सत्र; चार टप्प्यांमध्ये नियोजनलोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातर्फे विविध अभ्यासक्रमांच्या उन्हाळी सत्रातील परीक्षा आज, मंगळवारपासून सुरू होणार आहेत. या सत्रात एकूण ६४० परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षा ५६ दिवसांत घेण्याचे नियोजन विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केले आहे.बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बीबीए., बीसीए., अशा विविध अभ्यासक्रमांच्या एक ते सहा सत्रांतील परीक्षा उन्हाळी सत्रामध्ये होणार आहेत. विद्यापीठ संलग्नित कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील एकूण २८३ महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्रे असणार आहेत. या केंद्रांवर चार टप्प्यांमध्ये परीक्षा होतील. एम. एड्. एम.ए.. शिक्षणशास्त्र, शारीरिक शिक्षण आदी विषयांच्या प्रश्नपत्रिका ‘एसआरपीडी’ प्रणालीद्वारे पाठविण्यात येणार आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळातर्फे परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान, एका दिवसावर परीक्षा येऊन ठेपली असल्याने सोमवारी आपआपल्या नियोजनानुसार अभ्यास करून अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींनी रंगपंचमी साजरी केली.............................................................................२२ ते २४ एप्रिलदरम्यान परीक्षा नाहीलोकसभा निवडणुकीमुळे विद्यापीठाने उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. त्यानुसार दि. २२ ते २४ एप्रिल या कालावधीत विद्यापीठाची कोणतीही परीक्षा होणार नाही. या परीक्षा वेळापत्रकाच्या शेवटी होणार आहेत.............................................................................आकडेवारी दृष्टिक्षेपात* उन्हाळी सत्रात होणाऱ्या एकूण परीक्षा : ६४०* एकूण परीक्षार्थी : २ लाख ९० हजार* परीक्षा केंद्रे : २८३......................................................................................(संतोष मिठारी)