गडहिंग्लज :
छत्रपती शिवाजी महाराज हे महापराक्रमी योद्धे होते. नावातच ऊर्जा असणाऱ्या योद्धयाचे नाव लाभलेले शिवाजी विद्यापीठ जगातील पहिल्या ५० विद्यापीठांच्या यादीत यावे आणि जगभरात अग्रसेर ठरावे, अशी अपेक्षा शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. एन. जे. पवार यांनी व्यक्त केली. गडहिंग्लज येथे श्री रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटीचे सभासद, नूतन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के व प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्या सत्कारप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. भारती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आनंदराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिर्के म्हणाले, रवळनाथच्या सत्काराने विद्यापीठाच्या विकासाला बळ मिळाले आहे. पाटील म्हणाले, चौगुले यांची दूरदृष्टी व गुणग्राहकता यामुळेच 'रवळनाथ'ची चौफेर प्रगती झाली आहे. यावेळी बालवैज्ञानिक अथर्व कदम याच्यासह 'ज्ञानदीप'चे देणगीदार विजय आरबोळे, सोनाबाई पाटील, अनंत मायदेव, काशीबाई चौगुले, उमा तोरगल्ली, विजयकुमार घुगरे, रेखा पोतदार, एस. एन. देसाई, मारुती दळवी, शंकर कांबळे, शरद टोपले, भैरू वालीकर यांचाही सत्कार झाला.
कार्यक्रमास डी. आर. मोरे, एच. व्ही. देशपांडे, जे. बी. बारर्देस्कर, ए. एम. गुरव, दत्ता पाटील, मंगलकुमार पाटील, एस. डी. कदम, सुरेश चव्हाण, अशोक सादळे, डी. के. मायदेव उपस्थित होते.
संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी प्रास्ताविक, तर मीना रिंगणे यांनी स्वागत केले.
संताजी आणि धनाजी..: कोल्हापूरचे भूमिपुत्र असणारे शिर्के व पाटील हे बौद्धिक क्षेत्रातील संताजी व धनाजी आहेत. त्यांच्या कारकिर्दीत विद्यापीठाच्या नावलौकिकात नक्कीच भर पडेल, असा विश्वास कुलगुरू पवार यांनी व्यक्त केला.
गडहिंग्लज येथे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी. टी. शिर्के यांचा डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू एन. जे. पवार यांच्याहस्ते सत्कार झाला. यावेळी प्र. कुलगुरू पी. एस. पाटील, एम. एल. चौगुले, आनंदराव पाटील, मीना रिंगणे उपस्थित होते.
क्रमांक : १४०२२०२१-गड-०७