शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

शिवाजी विद्यापीठाने माणगाव परिषदेचे शताब्दी वर्ष साजरे करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 1:01 PM

माणगांव परिषदेचे शताब्दी वर्ष शिवाजी विद्यापीठाने साजरे करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने केली. ‘राष्ट्रवादी’चे (सामाजिक न्याय विभाग) राज्य उपाध्यक्ष अनिल कांबळे-माणगांवकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना निवेदन दिले.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठाने माणगाव परिषदेचे शताब्दी वर्ष साजरे करावे‘राष्ट्रवादी’च्या शिष्टमंडळाची मागणी; कुलगुरुंना निवेदन

कोल्हापूर : माणगांव परिषदेचे शताब्दी वर्ष शिवाजी विद्यापीठाने साजरे करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने केली. ‘राष्ट्रवादी’चे (सामाजिक न्याय विभाग) राज्य उपाध्यक्ष अनिल कांबळे-माणगांवकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना निवेदन दिले.या माणगांव परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या पूर्वार्धाला प्रारंभ होत आहे. त्यानिमित्त शाहू व भीम अनुयायांमध्ये उत्साह, चैतन्याचे वातावरण आहे. अनेक आंबेडकरी पक्ष, संघटना आपापल्या परीने हे शताब्दी वर्ष साजरे करीत आहेत. अशावेळी शिवाजी विद्यापीठाने शाहू संशोधन केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन, ललितकला विभाग यांच्या वतीने चर्चासत्रे, परिसंवाद, माहितीपट, ग्रंथ व ऐतिहासिक दस्तऐवज, छायाचित्रातून जीवनपटाचे प्रदर्शन, पथनाट्य, ललितकला, ग्रंथनिर्मिती याद्वारे हे शताब्दी वर्ष साजरे करावे; त्यासाठी समिती गठीत करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. त्यावर विद्यापीठात शताब्दी साजरी करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के उपस्थित होते.

या शिष्टमंडळात राष्ट्रवादीचे हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संभाजीराव पवार, उपाध्यक्ष नामदेव जोंधळे, तालुका युवक राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष विकास पाटील, कार्यकारिणी सदस्य हिरालाल कुरणे, बाळासाहेब कांबळे, शामराव कांबळे यांचा समावेश होता.

 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर