आॅनलाईन लोकमतकोल्हापूर , दि. 0६ : शिवाजी विद्यापीठातील विविध पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेच्या शनिवारी दुसर्या दिवशी ८ अभ्यासक्रमांसाठी ३,५४८ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आॅफलाईन पद्धतीने परीक्षा दिली. तर ४८१ परीक्षार्थी गैरहजर राहिले. कोल्हापूरातील शिवाजी विद्यापीठ, सायबर, सातारातील यशवंतराव चव्हाण इन्सिस्टयूट आॅफ सायन्स, कराड येथील संत गाडगेबाबा महाविद्यालय, सांगली येथील वालचंद कॉलेज येथील केंद्रावर शनिवारी बी. लिब. सायन्स अॅन्ड इन्फर्मेशन सायन्स, एम. लिब. सायन्स अॅन्ड इन्फर्मेशन सायन्स, एम. एस्सी. मायक्रो बायॉलॉजी, एम. एस्सी. मॅथेमॅटिक्स, एम. एस्सी. भूगर्भशास्त्र, एम. एस्सी. फिजिक्स, दूरशिक्षण केंद्र- एम. बी. ए. (एक्झिक्युटिव्ह) अॅन्ड एम. बी. ए., एम. एस्सी स्टॅटिस्टिक्सया परीक्षा आॅफलाईन पद्धतीने घेण्यात आली. त्यासाठी ४०२९ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी नोंदणी केली. त्यापैकी ३५४८ जणांनी परीक्षा दिली, तर ४८१ परीक्षार्थी गैरहजर होते.या परीक्षांसाठी विद्यापीठातील मानव्यशास्त्र इमारत आणि रसायनशास्त्र विभाग आणि सायबर, सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स, सांगलीतील सकाळी साडेनऊ ते साडेदहा, सकाळी अकरा ते दुपारी साडेबारा, दुपारी एक ते अडीच आणि दुपारी तीन ते सायंकाळी सहा अशा सत्रांमध्ये परीक्षा झाली. या परीक्षांसाठी सकाळ पासूनच शिवाजी विद्यापीठ परिसर गर्दीने फुलला होता. (प्रतिनिधी)
शिवाजी विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षा सुरू
By admin | Published: May 06, 2017 7:25 PM