शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
2
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
3
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
4
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
5
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
6
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
7
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
8
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
9
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
10
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
11
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
12
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
13
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
14
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
15
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
16
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
17
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
18
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
19
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...

शिवाजी विद्यापीठ खेळाडूंसाठी यावर्षीपासून देणार ‘प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2022 1:07 PM

खेळाडूंना स्पर्धेदरम्यान कालावधी कमी असल्यास सोयीच्या वाहन प्रकाराने प्रवास करण्यास खास बाब म्हणून परवानगी

कोल्हापूर : अधिविभाग आणि संलग्नित महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणाऱ्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर क्रीडा शिष्यवृत्ती योजना शिवाजी विद्यापीठाने यावर्षीपासून सुरू केली आहे. खेळाडूंना स्पर्धेदरम्यान कालावधी कमी असल्यास सोयीच्या वाहन प्रकाराने प्रवास करण्यास खास बाब म्हणून परवानगी दिली असल्याची माहिती विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण अधिविभागाने बुधवारी दिली.कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांना दिलेल्या विविध मागण्यांच्या निवेदनानंतर क्रीडा अधिविभागाने कामगिरीची माहिती दिली. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या सुबिया मुल्लाणी, रोहन कांबळे, स्वाती शिंदे, अनुष्का पाटील, संकेत सरगर, नंदिनी साळोखे यांना प्रोत्साहनपर प्रत्येकी ५० हजार रुपये इतका मदतनिधी दिला आहे.गेल्या शैक्षणिक वर्षात बंगळुरू येथे झालेल्या द्वितीय खेलो इंडिया स्पर्धेत विद्यापीठाच्या क्रीडापटूंनी वेगवेगळ्या क्रीडाप्रकारांत एकूण २२ पदके मिळवून देशात १० वा क्रमांक प्राप्त केला. स्पोर्ट्स हॉस्टेल बांधण्यात येणार असून, ३०० खेळाडूंची निवास व्यवस्था तेथे होणार आहे. विद्यापीठाने मिशन ऑलिम्पिक ही संकल्पना घेऊन काम सुरू केले असून, त्या दृष्टीने या सुविधा उपयुक्त ठरणार आहेत. इनडोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तयार करण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या क्रीडा विभागाच्या खेळाडूंनी गेल्या पाच वर्षांत एकूण २८० पदकांची कमाई केली असल्याची माहिती या विभागाने दिली.

गेल्या पाच वर्षांतील पदकांची कमाई

वर्ष                   पदके२०१६-१७             २९२०१७-१८             ४४२०१८-१९             ४०२०१९-२०             ४१२०२१-२२             १२६

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठ