शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

शिवाजी विद्यापीठ करणार तमिळ विद्यापीठासोबत सामंजस्य करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 11:48 PM

संदीप आडनाईक । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे भोसले यांच्यामुळे कर्नाटक आणि तमिळनाडू ...

संदीप आडनाईक ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे भोसले यांच्यामुळे कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांत जतन झालेल्या मराठी संस्कृतीचा अहद् तंजावर, तहद् पेशावरचा इतिहास उजेडात येण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. या संदर्भात शिवाजी विद्यापीठ आणि तमिळ विद्यापीठामध्ये एप्रिलमध्ये सामंजस्य करार होणार आहे. त्यामुळे इतिहास संशोधकांना दोन्ही प्रदेशांबरोबरच त्यांच्या सावत्र नात्यावरही आणखी प्रकाश पडणार असून, संशोेधनाचे नवे द्वार उघडणार आहे.चार वर्र्षांपूर्वी राज्य मराठी संस्कृती मंडळाच्या अनुदानातून तंजावरच्या ऐतिहासिक दस्तऐवजाच्या जतनीकरणाचा प्रकल्प सुरू झाला. या प्रकल्पावर कोल्हापूरचे मोडीतज्ज्ञ गणेश नेर्लेकर-देसाई यांच्यासह महाराष्ट्रातील काही मान्यवर काम करीत होते. यावेळी मंडळामार्फत सात लाख दुर्मीळ मोडी कागदपत्रांचे डिजिटायजेशन करण्यात आले. यानिमित्ताने तमिळ विद्यापीठासोबत सामंजस्य करार करता येईल, असा विचार सुरू झाला. त्याला तमिळ विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठाने अनुकूलता दर्शविली. त्याला आॅगस्ट २०१९ मध्ये मूर्त स्वरूप प्राप्त झाले.यासाठी स्थापन केलेल्या समितीवर राज्य मराठी विकास मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. आनंद काटीकर, सहायक संचालक डॉ. अशोक सोलणकर, तज्ज्ञ समिती सदस्य गणेश नेर्लेकर-देसाई, इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या पुरातत्त्व विभागाचे प्रा. डॉ. गिरीश मांडके, मुंबईचे मोडीतज्ज्ञ श्रीकृष्णाजी म्हात्रे यांची निवड करण्यात आली होती.सामंजस्य करारासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. अवनीश पाटील, गणेश नेर्लेकर, डॉ. नीलांबरी जगताप, तंजावरचे तमिळ विद्यापीठाचे कुलगुरू सी. बालसुब्रह्मण्यम, डॉ. विवेकानंद गोपाळ यांचा समावेश आहे.छत्रपतींचे घराणे म्हणून तंजावरचे भोसले घराणे ओळखले जाते; तेथील ऐतिहासिक व मोडी कागदपत्रांचे जतन त्या घराण्याने केले आहे, याची फार थोड्यांना माहिती आहे. तेथील माहिती घेण्यासाठी शिवाजी विद्यापीठाची एक समिती तंजावरला पाठविली. डॉ. अवनीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली या समितीने अभ्यास करून तंजावर व कोल्हापूरचे संबंध आणखी दृढ होतील अशी कागदपत्रे तपासली आहेत. त्यातून हा सामंजस्य करार अस्तित्वात येत आहे. यानिमित्ताने दोन राज्यांतील जुने संबंध पुन्हा जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.- डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ