संख्यात्मक आणि विश्लेषणात्मक अशा दोन टप्प्यांमध्ये नॅक मूल्यांकन होणार आहे. त्यातील ७० टक्के संख्यात्मक माहिती ‘नॅक’ला सादर केली आहे. उर्वरित ३० टक्के विश्लेषणात्मक मूल्यांकनासाठी समिती विद्यापीठात येणार आहे. ‘नॅक’ मूल्यांकन समितीचे अध्यक्ष मोहनलाल सुखाडिया विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. जे. पी. शर्मा, सदस्य सचिव डॉ. बी. आर. कौशल (बेंगलोर), डॉ. एसएएच मुनोद्दीन (पश्चिम बंगाल), डॉ. तरुण अरोरा भटिंडा (पंजाब), डॉ. सुनीलकुमार (दिल्ली), डॉ. हरीश चंद्रादास (मेघालय) हे रविवारी कोल्हापूरमध्ये दाखल झाले. त्यांचे स्वागत कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी केले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर. के. कामत, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. एम. एस. देशमुख उपस्थित होते. समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांनी ‘झिरो डे’ बैठक घेतली. त्यात कुलगुरू, प्र-कुलगुरू, आदींसमवेत चर्चा करून त्यांनी मूल्यांकनासाठीच्या पाहणीचे तात्पुरते नियोजन, वेळापत्रक ठरविले. दरम्यान, समिती येणार असल्याने रविवारी विद्यापीठातील विविध विभागांमधील काम सुरू होते. कॅम्पसमध्ये साफसफाई, रंगरंगोटीची कामे करण्यात येत होती.
चौकट
कुलगुरूंचे सादरीकरण
या मूल्यांकनाच्या प्रक्रियेतील पहिल्या दिवशी सोमवारी सकाळी नऊ वाजता प्रारंभी कुलगुरू डॉ. शिर्के हे विद्यापीठाच्या एकूण कामकाजाबाबत नॅक समितीसमोर सादरीकरण करतील. त्यानंतर पुढील दोन दिवस ३४ पैकी निम्म्या अधिविभागांना समिती भेट देऊन पाहणी करणार आहे.
फोटो (१४०३२०२१-कोल-नॅक तयारी ०१, ०२) : शिवाजी विद्यापीठात सोमवारी नॅक मूल्यांकन समिती येणार आहे. त्यासाठी दूरशिक्षण केंद्राने या समितीसमोर सादरीकरणासाठीची तयारी पूर्ण केली आहे.