केआयटी आयएमईआर या संस्थेतून एमबीए आणि एमसीए हे पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविले जातात. या अभ्यासक्रमांना एआयसीटीई दिल्ली आणि डीटीई मुंबईची मान्यता आहे. सन १९९४ पासून आयएमईआरमधून एमबीए, तर सन २००९ पासून एमसीए हा अभ्यासक्रम शिकविला जातो. आयएमईआरने सन २०१६ मध्ये ‘नॅकचे ए’ मानांकन मिळविले आहे. आयएमईआरमध्ये एमबीएसाठी १२० जागा, तर एमसीएसाठी ६० जागांची प्रवेश क्षमता आहे. दरवर्षी या संस्थेमध्ये आयमरिस्टॅक या इव्हेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेला संधी दिली जाते. ‘आयएमईआर’ने वेगवेगळ्या क्षेत्रातील उद्योग आणि संस्थांच्या सहकार्याने शैक्षणिक गुणवत्ता सातत्याने वाढविली असल्याची माहिती उपाध्यक्ष सुनील कुलकर्णी आणि सचिव दीपक चौगुले यांनी दिली. यावेळी संचालक डॉ. विलास कार्जिन्नी, आयएमईआरचे संचालक डॉ. सुजय खाडिलकर उपस्थित होते.
चौकट
कक्षा रूंदावण्यास मदत
व्यवस्थापनशास्त्र आणि कॉम्प्युटर ॲॅप्लिकेशनच्या जगात आयएमईआरने वेगळा ठसा उमटविला आहे. शिवाजी विद्यापीठाने दिलेल्या कायमस्वरूपी संलग्नतेमुळे आयएमईआरच्या कक्षा रुंदावण्यास मदत होणार असल्याचे भरत पाटील यांनी सांगितले.
फोटो (१४०५२०२१-कोल-केआयटी कॉलेज)
===Photopath===
140521\14kol_10_14052021_5.jpg
===Caption===
फोटो (१४०५२०२१-कोल-केआयटी कॉलेज)