शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

‘शिवभोजन’ने भागवली पावणेसहा लाख कष्टकऱ्यांची भूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2020 2:25 AM

कष्टकरी, वंचितांसाठी आधार; कोल्हापुरात पावणेसहा लाख लोकांनी घेतला लाभ

- नसिम सनदी कोल्हापूर : कोरोनाकाळात घराघरांत खाण्याचे वांदे होत असताना राज्य सरकारच्या शिवभोजन थाळीने मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल पावणेसहा लाख कष्टकऱ्यांची भूक भागवण्याचे काम केले आहे. अवघ्या पाच रुपयांत मिळणारी ही थाळी कष्टकरी, वंचितांसाठी आधार झाल्याचे चित्र दिसत आहे.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर दक्षिणेतील राज्यांच्या गरीब थाळीच्या धर्तीवर २६ जानेवारीपासून राज्यात शिवभोजन थाळी सुरू केली आहे. मार्चमध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन करावा लागल्यानंतर खºया अर्थाने या थाळीची किंमत अनेकांना कळली. एकट्या मे मध्ये मागणी एक लाख १२ हजारांवर गेली. लॉकडाऊनच्या काळात गरजूंना किमान एकवेळचे तरी पोटभर जेवण मिळावे म्हणून केंद्रचालकांना मिळणारे अनुदान कमी न करता, थाळीची किंमत १० वरून पाच रुपयांवर आली. कोरोनामुळे अर्थचक्र रुळावर आलेले नसल्यामुळे ही किंमत पुढील आदेश येईपर्यंत वाढवली जाणार नाही.कष्टकºयांना डोळ्यांसमोर ठेवूनच ही थाळी सुरू करण्यात आली असून, त्याचा गरजवंतांनाच लाभ होईल, याकडे कटाक्षाने पाहिले जात आहे. सर्व केंद्रचालकांचेही चांगले सहकार्य असून कोणाचीही तक्रार नाही. - दत्तात्रय कवितके, जिल्हा पुरवठा अधिकारी