नितीन भगवानपन्हाळा: ऐतिहासिक पन्हाळगडावर शिवजयंती निमित्त शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने नगरपरिषद व हिंदू समाज शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने साजरा करण्यात आला. शिवमंदिर येथे शिवजन्मकाळ सोहळा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी महिलांनी पाळणा गीत व शिवआरती म्हटले. समस्त मुस्लिम बांधवांनी शिवमंदिरात येवुन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करुन घोषणांनी परिसर दणाणून सोडला व शुभेच्छा दिल्या. ईद निमित्त शुभेच्छांची देवाण घेवाण करण्यात आली. मुख्याधिकारी व प्रशासक चेतन कुमार माळी यांनी मनोगत व्यक्त केले.पन्हाळ्यातुन विविध ठिकाणी शिवज्योती गेल्याची नोंद सहाशे इतकी झाली. यासाठी सुमारे दीडशे पोलिस बंदोबस्त नेमल्याचे निरीक्षक स्नेहा गिरी यांनी सांगितले. शिवज्योती नेणाऱ्या शिवभक्तांसाठी विविध मंडळांच्या वतीने चहा, नाष्ट्याची सोय करण्यात आली होती. सायंकाळी हिंदू समाज शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने पारंपारिक पेहराव्यात ढोल, ताशांच्या गजरात मिरवणूक काढून शिवजयंतीची सांगता करण्यात येणार आहे.
पन्हाळगडावर पारंपारिक पद्धतीने शाही शिवजन्मोत्सव सोहळा, मुस्लिम बांधवांनी शिवरायांना अभिवादन करुन केला जयघोष
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 11:58 AM