आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. २७ : कोल्हापूर शहर आणि जिल्हा शिवजयंती उत्सवासाठी सज्ज झाले आहे. अक्षयतृतियेच्या मुहूर्तावर अनेक तरुण मंडळे आणि तालीम मंडळांनी अनेक ठिकाणी विविध विधायक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.मुंबईचे भद्रकाली बेंजो पथक सजिव देखावे संयुक्त रविवार पेठ शिवजयंती समितीच्या वतीने आज, शुक्रवारी सायं. ५ वा काढण्यात येणार्या मिरवणूकीमध्ये मुंबईचे भद्रकाली बेंजो पथक व शिवकालीन सजिव देखावे हे आकर्षण असणार आहेत. यासह आकर्षक विद्युत रोषणाई व ढोलताशा मिरवणूकीच्या अग्रस्थानी असणार आहेत.शंभर मंडळाचा सहभागमंगळवार पेठ राजर्षी शाहू तरूण मंडळातर्फे काढण्यात येणार्या मिरवणूकीत पारंपारीक ढोलताशा, प्रबोधनात्मक फलक आणी पारंपारीक पोशाखातील कार्यकर्ते यामध्ये सहभागी होणार आहे. या मिरवणूकीमध्ये आसपाच्या परिसरातील जवळपासव १०० मंडळांचे पदाधिकारी आपल्या कार्यकर्तांसह सहभागी होणार आहेत.धनगरी ढोलसयुक्त उत्तरेश्वर पेठ शिवजयंती समितीच्या वतीने साय.५ वा उत्तरेश्वर मंदिर येथे शिवजयंती मिरवणूक काढण्यात येणार आहे. धनगरी ढोल, बॅँड पथक, लेझीम यासह वारकरी संप्रदाय, पारंपारीक शिवकालीन पोषाख हे मिरवणूकीचे आर्कषण असणार आहे.संयुक्त जुना बुधवार पेठ भव्य मिरवणूकसयुक्त जुना बुधवार पेठेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंती भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. छत्रपती शिवरायांचा भव्य सिहांसनारूढ पुतळा मिरवणूकीच्या अग्रस्थानी असणार आहे. तर घोडे- पारंपारीक वेशतील मावळे, समाजप्रबोधनात्मक फलक हे मिरवणूकीचे आर्कषण असणार आहे. मिरवणूक मार्गावर विद्युत रोषणाई केली जाणार आहे.शिवशाही अवतरणार....आज, शुक्रवारी सकाळी नऊ वाजाता पंचरत्न शाहीर धोंडीराम मगदूम यांचा पोवडा होईल, मग शिवजन्म उत्वव होईल. त्यानंतर सांयकाळी चार वाजता सायबर चौक येथून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यामध्ये शिवपालखी, घोडे, उंट, बैलगाडीचा सहभाग, मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके यासह परिसरातील महिला व युवती मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत. शिव-बसव जयंती उत्सव जिल्हा विरशैव लिंगायत समाजाच्या वतीने शिवजयंती व बसवेश्वर जयंतीचे औचीत्य साधत चित्रदुर्ग मठ येथे सांय. ६ वा पालखी मिरवणूक व शोभायात्रा काढण्यात येणार आहे.कैलासगड स्वारी मंदिर मंगळवार पेठ परिसरातील कैलासगड स्वारी मंदिरात सकाळी ११.४५ वा. शिवजन्मकाळ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी परिसरातील महिलांच्या हस्ते पाळणा सोहळा होणार आहे.
शिवजयंती उद्या, कोल्हापूरकर सज्ज
By admin | Published: April 27, 2017 6:32 PM