शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे-अजित पवारांची डोकेदुखी वाढणार?; महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी अमित शाह यांच्यासमोर ठेवला नवा प्रस्ताव
2
नवरात्रीत भाजपाची पहिली यादी येणार?; येत्या १०-१२ दिवसांत चित्र स्पष्ट होण्याचे संकेत
3
Kolkata Doctor Case : ममता बॅनर्जींच्या राजीनाम्याची मागणी, पॉलीग्राफ टेस्ट आणि अटक; भाजपाचा घणाघात
4
अमित शाहांचा अजित पवारांना शब्द; मुंबई विमानतळावर जाता जाता झाली भेट
5
रात्री आठ वाजेपर्यंत करता येईल गौरी आवाहन; बाजारपेठेत खरेदीसाठी उडाली झुंबड
6
उधारीवर पुस्तके, यु-ट्यूबवरून अभ्यास; गरीब आदिवासी शेतकऱ्याचा मुलगा होणार डॉक्टर
7
आजचे राशीभविष्य - १० सप्टेंबर २०२४, कार्यपूर्ती, यश व कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
8
चिकुनगुनियामुळे मुलांमध्ये मेंदूच्या आवरणाला येतेय सूज; खबरदारी घेण्याचे आवाहन
9
नऊ कॅरेट सोन्यासाठीही हॉलमार्किंग बंधनकारक?; कमी शुद्धतेच्या सोन्यालाही मागणी वाढली
10
बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढल्याने चौघांवर गुन्हा; ‘लोकमत’च्या पाठपुराव्याला अखेर यश
11
Apple iPhone 16 Launch Event : डेडिकेटेड कॅमेरा बटण, Apple Intelligence आणि बरंच काही; iPhone 16 लॉन्च, किती आहे किंमत?
12
Apple iPhone 16 Launch Event : ३० मिनिटांत ८० टक्के चार्जिंग, आजवरचा मोठा डिस्प्ले; Apple Watch Series 10 लॉन्च
13
बलात्काराचे राजकारण ही शरमेची गोष्ट; अशा गुन्ह्यांमध्ये राजकारणाची संधी शोधू नये
14
दादांची ‘झाकली’ मूठ! अजितदादांचा वादा किती मर्यादित होता,  हे आता स्पष्ट होतंय
15
चिमुकल्याकडून मातीचं भांडं फुटलं, अख्खा देश शोकसागरात; नेमकं कारण तरी काय?
16
ऊर्जा क्षेत्रात भरीव भागीदारी; भारत-यूएईमध्ये चार करार, युवराज नहयान व मोदींची भेट यशस्वी
17
सगळे काही ‘मेड इन चायना’, त्यामुळेच भारतात बेरोजगारी; राहुल गांधींचा परदेशातून निशाणा
18
'नागपुरातील अपघातातील 'ती' कार चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलाची', सुषमा अंधारेंचा आरोप, बावनकुळेंनीही दिले प्रत्युत्तर
19
शेतकऱ्यांना मिळणार नवीन ओळख; आधारप्रमाणे विशेष ओळखपत्रासाठी नोंदणी सुरू
20
VIDEO: धडामssss.... कॉमेंट्री बॉक्समध्ये नासिर हुसेन खुर्चीवरून पडला, नक्की काय घडलं?

‘शिवराज्याभिषेक’तर्फे शनिवारपासून दुर्गसंवर्धन

By admin | Published: February 10, 2017 12:36 AM

शिवजयंतीनिमित्त उपक्रम : गडांची करणार स्वच्छता

कोल्हापूर : शिवजयंतीनिमित्त अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे शनिवार (दि. ११) ते १९ फेब्रुवारीदरम्यान दुर्गसंवर्धन मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत राज्यातील १०० गडकोटांची स्वच्छता केली जाणार आहे, अशी माहिती समितीचे कार्याध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.कार्याध्यक्ष सावंत म्हणाले, रायगडावरील मेघडंबरीतील शिवमूर्ती महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींची प्रबळ इच्छाशक्ती, उत्स्फूर्त सहभागाचे प्रतीक आहे. तोच आदर्श पुढे ठेवून राज्यातील शेकडो गडकोट-किल्ल्यांच्या जतन, संवर्धन, संरक्षणासाठीची पुढची पावले समितीतर्फे उचलण्यात येणार आहेत. त्याची सुरुवात या मोहिमेद्वारे केली जात आहे. मोहिमेची सुरुवात शनिवारी (दि. ११) सकाळी ८ वाजता पन्हाळगड येथून केला जाणार आहे. मोहिमेत कोल्हापूर, सांगली, सातारा, लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नाशिक, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, अहमदनगर, पुणे जिल्ह्यानतील १०० गडकोटांची स्वच्छता केली जाईल. यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती प्रमुख उपस्थित असणार आहेत. यावर्षी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा वाढदिवस ‘डिजिटल फलक मुक्त’साजरा करण्याचे समितीने ठरविले आहे. पत्रकार परिषदेस पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड, कोल्हापूर जिल्हा हॉटेल मालक संघाचे उज्ज्वल नागेशकर, सन्मान शेटे, साक्षी पन्हाळकर, उदय घोरपडे, विष्णू जोशीलकर, अनिल चौगुले, संजय पवार, शहाजी माळी, राहुल शिंदे, विनायक फाळके, हेमंत साळोखे, राम यादव, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)आपल्या परिसराची स्वच्छता करावीया मोहिमेसाठी राज्यभरातील शिवभक्तांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केले आहे. ज्यांना गडकोटांवर जाणे शक्य नाही त्यांनी आपले शहर, ऐतिहासिक, सार्वजनिक ठिकाणी अथवा घराच्या परिसराची स्वच्छता करावी, असे आवाहन अमर पाटील यांनी यावेळी केले.