शिवसेना अन् त्यांचं नेतृत्व बावचाळलंय, सामनाच्या अग्रलेखावर पवारांचा पलट'वार'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 06:13 PM2018-10-27T18:13:44+5:302018-10-27T18:22:36+5:30

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शिवसेनेनं सामना या मुखपत्रातून जोरदार टीका केली होती. या टिकेला अजित पवार कोल्हापूरात उत्तर दिलं.

Shivsena and his leadership have led spoiled, Ajit pawar talked on shivsena | शिवसेना अन् त्यांचं नेतृत्व बावचाळलंय, सामनाच्या अग्रलेखावर पवारांचा पलट'वार'

शिवसेना अन् त्यांचं नेतृत्व बावचाळलंय, सामनाच्या अग्रलेखावर पवारांचा पलट'वार'

googlenewsNext

कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेच्या अग्रलेखाला उत्तर दिले. शिवसेना सत्तेत आहे की विरोधी पक्षात हे त्यांनाही आणि त्यांच्या नेत्यालाही गेल्या साडेचार वर्षात कळालेलं नाही. शिवसेनेची अवस्था बावचाळल्यासारखी, गोंधळल्यासारखी झाली आहे. सत्तेत असलेल्यांनी निर्णय घ्यायचे असतात. पण, शिवसेना नुसत्या मागण्या करीत आहे, अशा शब्दांत पवार यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली.

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शिवसेनेनं सामना या मुखपत्रातून जोरदार टीका केली होती. या टिकेला अजित पवार कोल्हापूरात उत्तर दिलं. महाराष्ट्र प्रदेश तसेच कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस आयोजित एल्गार परिषदेत अजित पवारांनी उद्धव ठाकरेंवर वार केला. तसेच मोदी सरकार, सीबीआय, राफेल, यांसह मोदींवरही टीका केली. 
शिवसेना सत्तेत आहे की विरोधी पक्षात हे त्यांनाही आणि त्यांच्या नेत्यालाही गेल्या साडेचार वर्षात कळालेलं नाही. शिवसेनेची अवस्था बावचाळल्यासारखी, गोंधळल्यासारखी झाली आहे, असे म्हणत अजित पवार यांनी सामनाच्या अग्रलेखाला उत्तर दिलंय. तसेच सत्तेत असलेल्या शिवसेनेनं निर्णय घ्यायचे असतात. पण, शिवसेना केवळ मागण्या करत आहे, असे म्हणत अजित पवारांनी सेनेची खिल्लीही उडवली. 

अजित पवार हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ‘टाकाऊ’ माल- उद्धव ठाकरे

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून अजित पवारांना शालजोडीतले हाणले आहेत. अजित पवार यांच्या, काय तर म्हणे 25 तारखेला अयोध्येला जाणार. काय तिथं दिवा लावणार! अरे तुला तुझ्या बापाचं स्मारक पाच वर्षात करता आलं नाही. तिथं अयोध्येत जाऊन काय करणार आहे?, या विधानाचा शिवसेनेनं खरपूस समाचार घेतला होता. अजित पवार या माणसाला महाराष्ट्राच्या राजकारणात काडीमात्र किंमत नाही. काकांच्या पुण्याईने व कृपेनेच ते तरले आहेत. हे महाशय अधूनमधून शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळी परिस्थिती यावर त्यांच्या ‘मुतऱ्या’ थोबाडाने बोलत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस हा आजही शरद पवारांच्या करंगळीवर तरलेला एकखांबी तंबू आहे, अशी घणाघाती शिवसेनेच्या सामानातून करण्यात आली होती. 
 

Web Title: Shivsena and his leadership have led spoiled, Ajit pawar talked on shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.