शिवसेना दुतोंडी मांडूळासारखी - अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 04:04 AM2018-04-04T04:04:24+5:302018-04-04T04:04:24+5:30
राज्यातील भाजपा व शिवसेना या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शिवसेना तर दुतोंडी मांडूळासारखी आहे. त्यांना शेतीतील काहीच कळत नाही तरीही शेतकऱ्यांचा पुळका असल्याचा आव आणते, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी नेसरी येथे केली.
कोल्हापूर - राज्यातील भाजपा व शिवसेना या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शिवसेना तर दुतोंडी मांडूळासारखी आहे. त्यांना शेतीतील काहीच कळत नाही तरीही शेतकऱ्यांचा पुळका असल्याचा आव आणते, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी नेसरी येथे केली.
नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाच्या हल्लाबोल कार्यक्रमात ते म्हणाले, भाजपा सरकारकडून कर्जबुडव्या उद्योगपतींना कोट्यवधी रूपये दिले जातात. पण, शेतकºयांची सरसकट कर्जमाफी द्यायला सरकारकडे पैसे नाहीत.
राज्यातील आगामी विधानसभेच्या निवडणुका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालीच लढवल्या जातील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. आगामी निवडणुका समविचारी पक्षांशी आघाडी करून लढविल्या जाणार असल्याने अजितदादांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून ‘प्रोजेक्ट’ करण्याचा प्रश्नच येत नाही, असेही तटकरे यांनी सांगितले.