शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

ShivSena-Vanchit Alliance: कार्यकर्त्यांच्या पातळीवर युती कितपत उतरते त्यावरच यश, राजकीय विश्लेषकांचे मत

By विश्वास पाटील | Published: January 24, 2023 2:28 PM

ठाकरे-आंबेडकर युतीचे महाविकास आघाडीतही पडसाद उमटू शकतात

विश्वास पाटील कोल्हापूर : शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात झालेली युती कार्यकर्त्यांच्या पातळीवर कितपत उतरते यावरच या युतीचे महाराष्ट्राच्या राजकारणातील भवितव्य अवलंबून असेल, अशी प्रतिक्रिया राजकीय अभ्यासकांतून व्यक्त झाली. ही युती झाल्यानंतर ‘लोकमत’ने त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर नक्की काय परिणाम होईल, हे जाणून घेतले. शिवसेनेतील फुटीनंतर एकटे पडलेल्या ठाकरे यांना नवीन मित्र जोडल्याचे मानसिक आधार या युतीतून मिळू शकतो.राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर म्हणाले, उद्धव ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून परस्परविरोधी भूमिका असलेल्या लोकांशी युती करत आहेत. त्यांनी संभाजी ब्रिगेडशी आघाडी केली आहे. त्यानंतर आता आंबेडकर यांच्याशी युतीचा निर्णय घेतला. शिवसेनेतील बंडानंतरही मुंबईत ठाकरे गटाचे आजही वर्चस्व आहे. तिथे आंबेडकर यांना मानणाराही वर्ग आहे.शिवसेनेची हिंदूत्वाबद्दलची आक्रमक भूमिका राहिली आहे. आणि आंबेडकर यांचा हिंदुत्व, सावरकर विचारधारा यांना विरोध राहिला आहे. त्यामुळे हे मतभेद कसे सांधणार हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी दोन्हीकडील नेत्यांना पुढाकार घ्यावा लागेल. कारण मतभेदाचे प्रदर्शन झाल्यास भाजप व शिंदे गट त्याचे भांडवल करण्यास टपून बसलेला असेल. म्हणून दोन्हीकडील नेत्यांना तोंडावर नियंत्रण ठेवावे लागेल.

राजकीय विश्लेषक डॉ. प्रकाश पवार म्हणाले, या युतीचा जास्त फायदा शिवसेनेला होऊ शकतो. परंतु शिवसेनेचा पारंपरिक मतदार आंबेडकर यांना स्वीकारणार का, हे पाहणे जास्त महत्त्वाचे आहे. आतापर्यंत परस्परविरोधी विचारधारेचे हे दोन पक्ष आहेत. त्यांचे हितसंबंध वेगवेगळे आहेत. आंबेडकर यांचा पक्ष चळवळीशी संबंधित आहे. शिवसेना तशी प्रस्थापित वर्गाचे राजकारण करते. गावपातळीवर हे घटक एकमेकांच्या विरोधात राहिले आहेत. त्यामुळे नेत्यांतील मनोमीलन कार्यकर्त्यांच्या पातळीवर घडवून आणण्याचे आव्हान असेल.महाविकास आघाडीतही पडसादठाकरे-आंबेडकर युतीचे महाविकास आघाडीतही पडसाद उमटू शकतात, असे या दोन्ही विश्लेषकांना वाटते. कारण राष्ट्रवादी हा बहुजन समाजाच्या नावाखाली मुख्यत: मराठ्यांच्या हिताचे राजकारण करणारा पक्ष आहे. फुटीनंतर शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींचे संख्याबळ कमी झाले आहे. त्यांना महाविकास आघाडीतील जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी नव्या युतीचा फायदा होऊ शकेल.

काही निरीक्षणे...

  • आंबेडकर यांना मानणारा मतदार शिवसेनेकडे वळेल
  • शिवसेनेचा पारंपरिक मतदार वंचितकडे वळवण्याचे आव्हान
  • दोन्ही पक्षांच्या मतदारांनी युती स्वीकारली तर त्याचा मोठा लाभ दोघांनाही
  • आंबेडकर यांना महाविकास आघाडीतील अन्य दोन पक्ष कितपत स्वीकारतात यावर प्रश्नचिन्ह
टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMahavikas Aghadiमहाविकास आघाडी