शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
मेल्यावरही फरफट, झोळीतून नेला देह, रस्ताच नसल्याने चार किमी पायपीट, पेणमधील विदारक चित्र
3
"जागतिक महासत्तांच्या यादीत भारत हवा", व्लादिमीर पुतिन यांचं विधान
4
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
5
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
6
"काँग्रेसकडून जाती-जातीत भांडण लावण्याचा खतरनाक खेळ, म्हणूनच 'एक है तो सेफ है"', नरेंद्र मोदी यांचा घणाघात
7
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
8
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
9
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
10
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
11
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
12
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
13
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
14
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
16
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
17
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
18
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
20
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान

जयसिंगपुरात शिवसेनेचा मोर्चा

By admin | Published: January 29, 2016 10:09 PM

बांधकाम विभागाचे अधिकारी धारेवर : चौपदरीकरणाचे काम सुरू करण्याची मागणी

जयसिंगपूर : गेल्या पाच वर्षांपासून सांगली-कोल्हापूर महामार्गावरील रस्त्याचे काम अनेक कारणावरून बंद आह़े त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढून महामार्गावर वाहतूक करणे धोकादायक ठरत आहे. यामुळे तत्काळ रस्ते करण्यात यावेत, या मागणीसाठी शुक्रवारी दुपारी शिवसेनेने जयसिंगपूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. दरम्यान, तालुकाप्रमुख सतीश मलमे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता आर. एस. प्रभूणे यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करून धारेवर धरले. यावेळी काही काळ तणाव निर्माण झाला होता. प्रभूणे यांनी मागण्यांप्रश्नी वरिष्ठांना कळविण्याचे आश्वासन दिले. यावेळी मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले.तालुकाप्रमुख मलमे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तमदलगे खिंड बायपास ते अंकली पूल चौपदरीकरणाचे काम व अंतर्गत रस्ते तत्काळ सुरू करण्याची मागणी केली. शासनस्तरावर आमदार उल्हास पाटील व अधिकारी यांच्यावतीने पाठपुरावा करूनही ठेकेदारांकडून काम बंद अवस्थेत आहे. त्यामुळे सांगली व कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनधारकांची व नोकरदारांची गैरसोय होत आहे. तसेच तमदलगे, निमशिरगाव, जैनापूर, दानोळी, कवठेसार, कोथळी, उमळवाड व चिपरी या भागांमधील शेतकऱ्यांचा भाजीपाला जयसिंगपूर, इचलकरंजी, कोल्हापूर व सांगली या मार्गाने शहरामध्ये जात असतो. त्यामुळे वाहनांची रहदारी जास्त असते. तसेच शालेय विद्यार्थ्यांचीही मोठी गैरसोय होत आहे. काम अपुरे असल्यामुळे जागोजागी खड्डे असल्याने अपघातांच्या घटना घडत आहेत. जयसिंगपूर रेल्वेस्थानक ते उमळवाड फाटा या रस्त्यांची अवस्था देखील दयनीय आहे. रस्त्याचे चौपदरीकरण व अंतर्गत रस्ते १५ दिवसांत तत्काळ सुरू करावेत; अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिली. आंदोलनात जयसिंगपूर शहरप्रमुख सूरज भोसले, माणिक जगदाळे, मंगेश चौगुले, साजिदा घोरी, सुकुमार नेजकर, म्हागू नाईक, अरुण होगले, नेमगोंड पाटील, रतन पडियार, अरुण लाटवडे, सुनील शिंदे, जयपाल कोळी, आकाश शिंगाडे, विशाल माळी यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)