कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनची महिला क्रिकेट खेळाडू शिवाली शिंदेची २३ वर्षांखालील महिला एकदिवसीय चॅलेंजर करंडक स्पर्धेसाठी इंडिया ग्रीन संघात निवड झाली. रांची येथे २० ते २४ एप्रिलदरम्यान या स्पर्धा होणार आहेत. यामध्ये इंडिया रेड, इंडिया ब्ल्यू, इंडिया ग्रीन या तीन संघांत एकदिवसीय साखळी स्पर्धा होणार आहे. इंडिया ग्रीन संघाचा पहिला सामना २१ एप्रिल रोजी इंडिया ब्ल्यू संघाशी होणार आहे. शिवाली शिंदे हिची २०१५-१६ यावर्षीच्या बंगलोर येथील १९ वर्षांखालील नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये निवड, १९ वर्षांखालील महाराष्ट्र महिला संघात सलग चार वर्षे, तसेच महाराष्ट्र संघाची कर्णधार म्हणून तिने काम पाहिले आहे. आॅल इंडिया इंटर झोनल १९ वर्षांखालील महिला स्पर्धेसाठी खुल्या पश्चिम विभागीय (भारतीय) महिला क्रिकेट संघात उपकर्णधार पदी निवड तसेच ती सलग सहाव्या वर्षी खुला गट महाराष्ट्र महिला संघातून खेळत आहे.
शिवाली शिंदेची इंडिया ग्रीन क्रिकेट संघात निवड-एकदिवसीय चॅलेंजर करंडक स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 6:16 PM
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनची महिला क्रिकेट खेळाडू शिवाली शिंदेची २३ वर्षांखालील महिला एकदिवसीय चॅलेंजर करंडक स्पर्धेसाठी इंडिया ग्रीन संघात निवड झाली.
ठळक मुद्दे२३ वर्षांखालील महिला एकदिवसीय चॅलेंजर करंडक स्पर्धेसाठी