कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून, गेल्या २४ तासांत पाच महिन्यांतील सर्वाधिक म्हणजे ८३२ नवीन रुग्ण आढळले आहेत, तर २२ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण आणि मृत्यूची संख्या पाहता, पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्हा धोकादायक स्थितीकडे जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता तरी नागरिकांनी नियमांचे पालन करत ही रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
कोल्हापूर शहरामध्ये तब्बल २९६ नवीन रूग्ण आढळले असून, त्याखालोखाल ११४ रुग्ण करवीर तालुक्यात नोंदवण्यात आले आहेत. नगरपालिका क्षेत्रात ९४ नागरिक पॉझिटिव्ह आले असून, गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे दोन रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरामध्ये १८३२ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, २८४१ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. ८८३ जणांची अन्टिजेन टेस्ट करण्यात आली असून, ४५५५ जणांवर उपचार सुरू आहेत. गेल्या २४ तासांत २२ जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये इतर जिल्ह्यातील पाचजणांचा समावेश आहे.
चौकट
मृतांमध्ये १८ पुरुष
मृतांमध्ये २२ पैकी १८ जण पुरुष असून, सविस्तर तालुकावार माहिती खालीलप्रमाणे
कोल्हापूर
जरगनगर येथील ५८ वर्षीय महिला, रूईकर कॉलनी येथील ७२ वर्षीय पुरुष, राजारामपुरी येथील ४० वर्षीय पुरुष
हातकणंगले
खोची येथील ७२ वर्षीय पुरुष, हातकणंगले येथील ७४ वर्षीय महिला, मिणचे सावर्डे येथील ४५ वर्षीय पुरुष
करवीर
वाकरे येथील ७५ वर्षीय महिला, मुडशिंगी येथील ८६ वर्षीय पुरुष
आजरा
लाटगाव येथील ७८ वर्षीय पुरुष, भादवण येथील ७५ वर्षीय पुरुष
शिरोळ
जयसिंगपूर येथील ६५ वर्षीय पुरुष, शिरटी येथील ५० वर्षीय पुरुष
इचलकरंजी
बंडगर मळा येथील ६० वर्षीय महिला
कागल
करंजिवणे येथील ६५ वर्षीय महिला
राधानगरी
तळाशी येथील ६५ वर्षीय पुरुष
शाहूवाडी
गजापूर येथील ६५ वर्षीय पुरुष
पन्हाळा
माले येथील ३८ वर्षीय पुरुष
इतर जिल्हे
सिंधुुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील साडुरे येथील ७२ वर्षीय पुरुष व दिघी येथील ४९ वर्षीय पुरुष
निपाणी तालुक्यातील साखरवाडी येथील ५२ वर्षीय पुरुष
मंगळवेढा तालुक्यातील खुपसिंगी येथील ४७ वर्षीय पुरुष
कराड तालुक्यातील मलकापूर येथील ६५ वर्षीय पुरुष