स्पर्धेसाठी आप्पासाहेब शिवणे, शर्मिली पोतदार, प्रवीण नेसरीकर, प्रवीण माळी, महेश शहा, भरत येसरे, राहिल खलिफा, किरण कापसे यांचे सहकार्य लाभले. संदीप भोसले यांनी स्पर्धेचे संयोजन केले.
- २) देसाई हॉस्पिटलमध्ये कोविड लसीकरण
गडहिंग्लज : डॉक्टर्स कॉलनी गडहिंग्लज येथील देसाई हॉस्पिटलमध्ये कोविड -१९ चे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत लसीकरण केले जाणार आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. चंद्रशेखर देसाई यांनी केले आहे. ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त रुग्णांसाठी लसीकरणाची सोय उपलब्ध असून, लसीकरणासाठी नागरिकांनी आधारकार्ड आणि मोबाइल घेऊन यावे, तसेच व्याधीग्रस्त रुग्णांनी डॉक्टरांचे प्रमाणपत्र घेऊन यावे.
३) ओंकारमध्ये राज्यस्तरीय वेबिनार
गडहिंग्लज : येथील ओंकार शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महविद्यालयात इतिहास व ग्रंथालय विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील राज्यस्तरीय ऑनलाइन वेबिनार पार पडले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण होते.
कार्यशाळेत डॉ. विकास कदम, डॉ. सुरेश शिखरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत ८० प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांनी भाग घेतला.
समीर कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. हर्षदा कुंबळाळे यांनी अतिथी परिचय करून दिला. धर्मवीर क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. बसवराज मगदूम यांनी आभार मानले.