प्रतिक्रिया
कोल्हापूर शहर वेगळे युनिट करून येथील सर्व दुकाने सुरू करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला जाईल. दोन दिवस दुकाने बंद ठेवा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले. त्याला प्रतिसाद देत आम्ही दुकाने पुन्हा बंद करत आहोत. दोन दिवसांत परवानगी न मिळाल्यास गुरुवारपासून आम्ही पूर्ववत दुकाने सुरू करणार आहोत. शहराला वेगळे युनिट करण्यासाठी आम्हीदेखील लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत.
-संजय शेटे, अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स
सर्व दुकाने सुरू करण्याबाबत अनेकवेळा चर्चा झाल्या. पण, कोल्हापूर शहर व इचलकंरजी स्वतंत्र युनिट करण्याचा प्रस्ताव पहिल्यांदाच अधिकृतपणे जिल्हा प्रशासनाच्यावतीने शासनाकडे जात आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून कोल्हापूरमधील सर्व दुकाने बंद आहेत. यापुढे आमची दुकाने बंद ठेवण्याची मानसिकता नाही.
-ललित गांधी, अध्यक्ष, राजारामपुरी व्यापारी असोसिएशन