प्रांत कार्यालयात निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : अत्यावश्यक सेवा सोडून इतर व्यवसाय हा गेल्या ७३ दिवसांपासून बंद आहे. दुकाने शासन निर्बंधानुसार चालू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. त्याबाबत कोणताच निर्णय न दिल्याने सह्यांची मोहीम राबविण्यात आली. येत्या २१ जूनपासून दुकाने उघडणार असल्याचे निवेदन येथील विविध व्यापारी संघटनेने प्रांत कार्यालयात दिले.
निवेदनात, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शासन अपयशी ठरले आहे. त्याचा परिणाम येथील व्यापा-यांना भोगावा लागत आहे. शासन निर्बंधानुसार दुकाने चालू ठेवण्याची परवानगी मिळावी, याबाबत याआधी निवेदन दिले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनीही बैठक घेऊन निर्णय देण्याचे सांगितले होते. परंतु अजूनही कोणताच निर्णय न झाल्याने २१ जूनपासून दुकाने सुरू करण्याचा इशारा दिला आहे.