शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

राज्याचा निर्णय होईपर्यंत दुकाने बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 7:33 PM

CoronaVirus Kolhapur : दुकाने सुरू करण्यासंबंधात व्यापाऱ्यांच्या राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली आहे. हा विषय राज्यस्तरीय असून दोन दिवसांत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत व्यावसायिकांनी बंद ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी केले. आज शुक्रवारी काही निर्णय न झाल्यास याबाबत सोमवारीच काही निर्णय अपेक्षित आहे. शनिवार-रविवारी वीकेंन्ड लॉकडाऊन असल्याने सर्वच व्यवहार बंद राहणार आहेत.

ठळक मुद्देराज्याचा निर्णय होईपर्यंत दुकाने बंदच जिल्हाधिकारी दौलत देसाई : व्यापाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन

कोल्हापूर : दुकाने सुरू करण्यासंबंधात व्यापाऱ्यांच्या राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली आहे. हा विषय राज्यस्तरीय असून दोन दिवसांत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत व्यावसायिकांनी बंद ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी केले. आज शुक्रवारी काही निर्णय न झाल्यास याबाबत सोमवारीच काही निर्णय अपेक्षित आहे. शनिवार-रविवारी वीकेंन्ड लॉकडाऊन असल्याने सर्वच व्यवहार बंद राहणार आहेत.

ब्रेक द चेनअंतर्गत राज्य शासनाने सरसकट सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याला व्यावसायिकांनी तीव्र निषेध केला असून दुकाने सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. राज्यभरातून होत असलेला विरोध लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तसेच संलग्न संस्थांच्या प्रमुखांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली होती. सरकार व्यापाऱ्यांच्या विरोधात नाही, सकारात्मक निर्णय घेऊ, दोन दिवसांचा वेळ द्या, असे आवाहन त्यांनी केले होते. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी दुपारी व्यावसायिकांशी व्हीसीद्वारे संवाद साधला.यावेळी व्यावसायिकांनी गुढीपाडवा जवळ आला आहे. आधीच वर्षभर कोरोनामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, त्यात आता पुन्हा लॉकडाऊन झेपण्यासारखे नाही. आम्ही शासनाचे सर्व नियम पाळू; पण व्यवसायाची परवानगी द्या, अशी मागणी केली.त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय राज्य पातळीवर घेतला जाणार असल्याने मुख्यमंत्र्यांचा निर्णय होईपर्यंत थांबा, त्यांनी दिलेल्या शब्दाचा मान राखा, असे आवाहन केले. या चर्चेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स उपाध्यक्ष ललित गांधी, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, नाभिक संघटनेचे अध्यक्ष सयाजी झुंजार, हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर, ज्येष्ठ व्यापारी प्रदीपभाई कापडिया, हॉटेल कामगार संघटनेचे गिरीश फोंडे यांनी सहभाग घेतला.नियमावली शासनाला सादरव्यवसाय सुरू करताना कोणकोणते नियम पाळले पाहिजेत, यावर राज्य शासनाने व्यावसायिकांकडे मार्गदर्शक नियमावली मागितली आहे. ही नियमावली राज्य संघटनेने सादर केली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत यावर सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी