कोल्हापूर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे १० एप्रिलला राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पंकज देशपांडे यांनी दिली.
यावेळी न्यायालयातील प्रलंबित तडजोड-योग्य दिवाणी व फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, भूसंपादन, वैवाहिक वादाची, चलनक्षम दस्तऐवज कायदा कलम (एन.आय.ॲक्ट) १३८ खालील प्रकरणे, बँक वसुली, अपघात न्यायाधिकरणाची, कामगार न्यायालयाची प्रकरणे, तसेच पूर्व न्यायप्रविष्ठ प्रकरणात देखील कोणत्याही प्रकारचा खर्च न करता आपसी समझोत्याने वाद मिटवण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी आपले प्रकरण लोकन्यायालयात ठेवण्यासाठी जवळच्या न्यायालयाशी किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तालुका विधी सेवा यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
--
सुशिक्षित बेरोजगारांसाठी प्रशिक्षण
कोल्हापूर : प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध क्षेत्रांमधील सुशिक्षित बेरोजगारांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण नि:शुल्क असून, प्रशिक्षणाअंती प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. भविष्यात नोकरी, स्वयंरोजगार, रोजगाराची संधी देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी दिली.
तरी प्रशिक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या १५ ते ४५ वयोगटातील सुशिक्षित बेरोजगार इच्छुक उमेदवारांनी विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन कऱण्यात आले आहे.