कोल्हापूर : आनंदी फौंडेशन व योग मराठा वधू-वर सूचक केंद्र यांच्यावतीने आज रविवारी दसरा चौकातील शाहू स्मारक भवनमध्ये राज्यस्तरीय वधू-वर मेळावा भरत आहे. सकाळी साडेदहा ते दुपारी दोन या वेळेत होणाऱ्या मेळाव्याचे प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते नारायण पोवार असणार आहेत. द्राेणाचार्य पाटील हे यावेळी पालकांना मार्गदर्शन करणार आहेत. मोफत असणाऱ्या मेळाव्याचा विवाह इच्छुकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गिरीश पाटील यांनी केले आहे.
रोहित कुलकर्णी सीएस परीक्षा उत्तीर्ण
कोल्हापूर : दि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीतर्फे डिसेंबर घेतलेल्या सीएस परीक्षेत रोहित बाळकृष्ण कुलकर्णी यांनी चांगले यश मिळवले. त्यांना आई-वडील, शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. (फोटो: ०६०३२०२१-कोल-राेहित कुलकर्णी)
केशवराव भोसले नाट्यगृहात आज ठरणार कोल्हापूरची महाराणी
कोल्हापूर : कोल्हापुरात आज रविवारी महिला दिनाचे औचित्य साधून सौंदर्य स्पर्धा भरवण्यात आल्या आहेत. केशवराव भोसले नाट्यगृहात होणाऱ्या या कार्यक्रमात समकालीन आणि परंपरेच्या वेगळ्या मिश्रणाच्या संकल्पनेतून कोल्हापूरची महाराणी निवडली जाणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला निवेदिता घाटगे, अरुंधती महाडिक, मनीषा वास्कर, शौमिका महाडिक, नबीला मुश्रीफ, हसिना फरास, बाळासाहेब भानगिरे, नाना भानगिरे, रविकिरण इंगवले, आदिल फरास, रमेश माेरे, सुभेदार शिवाजी भोले हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.